‘भारतात गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ’

‘भारतात गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ’

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस अजेंडा समिटमध्ये सोमवार १७ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाइन होणार्‍या पाच दिवसीय या समिटच्या पहिल्या दिवशी ‘जगाची परिस्थिती’ या विषयावर भाषण केले. ‘दावोस अजेंडा’ शिखर परिषद सलग दुसऱ्या वर्षी डिजिटल पद्धतीने आयोजित केली जात आहे. यावेळी १३० कोटी भारतीयांच्या वतीने मी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी झालेल्या दिग्गजांचे स्वागत करतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत सावधगिरीने आणि आत्मविश्वासाने या महामारीच्या आणखी एका लाटेचा सामना करत अनेक आशादायक परिणामांसह आर्थिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहे. भारतासारख्या सशक्त लोकशाहीने संपूर्ण जगाला एक सुंदर भेट दिली आहे. आम्हा भारतीयांचा लोकशाहीवर अतूट विश्वास आहे. करोनाच्या या काळात, ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या संकल्पनेनुसार भारताने अनेक देशांना अत्यावश्यक औषधे, लस देऊन करोडो लोकांचे जीवन वाचवले आहे. आज भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा फार्मा उत्पादक देश आहे,” असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

सध्या भारतात ५० लाखांहून अधिक सॉफ्टवेअर डेव्हलपर काम करत आहेत. गेल्या सहा महिन्यांत १० हजारांहून अधिक स्टार्ट- अपची नोंदणी झाली आहे. बिझनेसमध्ये सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप या धोरणावर ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ला प्रोत्साहन देत आहे. भारताने कॉर्पोरेट कर दर सुलभ आणि कमी केले आहेत. भारताची नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता लक्षात घेता, भारतात गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. २०१४ मध्ये सुमारे शंभर नोंदणीकृत स्टार्टअप होते. आज ही संख्या ६० हजाराच्या पुढे गेली आहे, असे मोदींनी सांगितले.

हे ही वाचा:

काँग्रेस राजकीय पक्ष की दहशत पसरवणारे संघटन

गुरु रविदास जयंतीमुळे पंजाब निवडणुकीच्या तारखा बदलल्या

‘मेस्टा’ने केल्या राज्यातील काही शाळा सुरू

पंतप्रधान सुरक्षा दिरंगाईप्रकरणातील माजी न्या. इंदू मल्होत्रांना धमकी

स्वावलंबनाचा मार्ग अवलंबताना, भारताचे लक्ष केवळ प्रक्रिया सुलभ करण्यावर नाही, तर गुंतवणूक आणि उत्पादनाला प्रोत्साहन देण्यावरही आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. आज भारत वर्तमान आणि पुढील २५ वर्षांच्या उद्दिष्टांचा विचार करून धोरणे बनवत आहे. भारताच्या भरभराटीचा काळ हा शाश्वत आणि विश्वासार्ह असेल, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

Exit mobile version