पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार, १६ मे रोजी नेपाळ दौरा करणार आहेत. नरेंद्र मोदींचा हा एकदिवसीय नेपाळ दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यावर नरेंद्र मोदी गौतम बुद्धांचे जन्मस्थान असलेल्या लुंबिनीला भेट देणार आहेत. तसेच नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्याशी चर्चा करणार आहेत. पंतप्रधान झाल्यापासूनचा नरेंद्र मोदी यांचा हा पाचवा नेपाळ दौरा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १० वाजता लुंबिनीला पोहोचतील आणि संध्याकाळी ५ वाजता मायदेशी परततील. नेपाळमधील मायादेवीच्या मंदिरात नरेंद्र मोदी पूजाही करणार असून लुंबिनी डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमालाही ते संबोधित करणार आहेत.

हे ही वाचा:

फडणवीसांनी ठोकले!

होय, मुंबई वेगळी करायची आहे, पण तुमच्या भ्रष्टाचारापासून!

तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली केल्याशिवाय राहणार नाही

‘तुम्ही वैयक्तिक टीका करता, आम्ही म्याव म्याव केलं तर चालत नाही?’

दोन्ही पंतप्रधानांमध्ये जलविद्युत, विकास आणि कनेक्टिव्हिटी अशा अनेक क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवाय मीडिया अहवालानुसार, नेपाळ सरकार आपले महत्त्वाचे प्रकल्प चिनी कंपन्यांऐवजी भारतीय कंपन्यांना देण्याचा विचार करत आहे. त्यामुळे हा नरेंद्र मोदींचा दौरा महत्त्वाचा असणार आहे

Exit mobile version