‘मक्खन पर नहीं पत्थर पर लकीर खींचता हूं’

‘मक्खन पर नहीं पत्थर पर लकीर खींचता हूं’

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी जपानमधील भारतीयांनी बोलावलेल्या स्वागत समारंभात पंतप्रधान मोदींनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपण भारतात किती ठाम निर्णय घेतो, हे सांगण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींनी केला आहे. मुझे मक्खन पर लकीर खींचने में मजा नहीं आता, पत्थर पर लकीर खींचता हूं, असे पंतप्रधान म्हणाले आहेत. म्हणजे मी असेच निर्णय नाही तर जे घेते ते ठाम निर्णय घेतो, असे सांगण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींनी केला आहे.

माझ्यावर असे संस्कार आहेत की मी नेहमी मोठ्या आव्हानांसाठी आणि ध्येयांसाठी काम करतो. जपानमधील भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, आज भारत स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना आम्ही येत्या २५ वर्षांचा आराखडाही तयार करत आहोत. आम्ही खूप मोठे संकल्प घेतले आहेत, जे कठीण वाटतात. पण मला मिळालेली मुल्ये आणि ज्या लोकांनी मला घडवले त्यांनी मला कठीण गोष्टी सोप्या करण्याच्या सवयी लावल्या आहेत.

हे ही वाचा:

चहा प्रेमींसाठी आला सोन्याचा चहा!

इंग्लंडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपुढे सोनिया गांधीनी पसरला पदर

जपानी मुलाचं हिंदी ऐकून पंतप्रधान मोदी म्हणाले…

मशिदींतून काढलेले भोंगे शाळा, रुग्णालयांना दान

पुढे ते म्हणाले, माझ्यासोबत १३० कोटी देशवासीयांचा आत्मविश्वास, संकल्प आणि स्वप्ने आहेत. देशवासीयांची स्वप्नांची पूर्तता करण्याची आमच्यात अफाट क्षमता आहे. गेल्या दोन वर्षांत जागतिक पुरवठा साखळी बिघडली असून त्यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भविष्यात हे संकट टाळण्यासाठी आम्ही स्वावलंबनाच्या संकल्पाकडे वाटचाल करत आहोत.

Exit mobile version