23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारण'देशात विकास आणि आराध्य एकत्र पुढे गेलं पाहिजे'

‘देशात विकास आणि आराध्य एकत्र पुढे गेलं पाहिजे’

Google News Follow

Related

मंगळवार, १४ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील देहू दौऱ्यावर आले. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांनी देहूमध्ये वारकरी समुदायाला संबोधित केले आहे. आपला देश संतांच्या शिकवणीवर पुढे जात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते  श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते.

संतांची अनुभूती झाली तर इश्वराची अनुभूती होते. देहूच्या तीर्थक्षेत्रावर येण्याच सौभाग्य मिळाले असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले आहे. ते म्हणाले, देहू संत शिरोमणी जगदगुरु तुकाराम महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. देहूत पांडुरंग नांदतो आणि देहू पांडुरंगाचा निवास आहे. यावेळी, त्यांनी पालखी मार्गाचे काम होणार असल्याचे सांगितले आहे. हे काम तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. यामध्ये ३५० किमी पेक्षा जास्त अंतराचे महामार्ग होणार आहेत. तसेच यासाठी ११ हजार कोटींहून अधिक खर्च येणार असल्याचे मोदींनी सांगितले आहे. त्याशिवाय पालखी मार्गाचे चारपदरी पूर्ण होणार आहेत. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमार्ग चार टप्प्यात पूर्ण होणार आहे.

भारत संतांच्या शिकवणीतून पुढे जात आहे असे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले, देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय. याचे श्रेय भारतातील संत आणि ऋषिना आहे भारत शाश्वत आहे कारण भारत ही संताची भूमी आहे. प्रत्येकवेळी मार्गदर्शनसाठी इथे सद्पुरुष जन्माला आले आहेत. संत ज्ञानेश्वर समाधीचे ७२५ वर्ष आहे. यांच्यामुळेच भारत गतीशील आहे. संत तुकारामांनी दुष्काळ पाहिला, दुःख पाहिले, भूकबळी पाहिले. त्यामुळे संत तुकाराम त्यावेळी समाजासाठीच नव्हे तर भविष्यासाठी पुढे आले.

शिळेचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, ही शीळा त्यांच्या वैराग्याचे साक्ष आहे. संत तुकराम महाराजांच्या दयेचा आणि करुणेचा ठेवा अभंगांत आहे. या अभंगांतुन या पिढीला प्रेरणा मिळत आहे. आजही देश जेव्हा सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर पुढे जातोय, त्यावेळी तुकारामांचे अभंग प्रेरणा, दिशा देतात. सर्व संतांच्या अभंगांनी प्रेरणा मिळते. सार्थ अभंग गाथांनी संत परंपरेचे ५०० अभंग सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत. आपला देश विकासाच्या मार्गावर आहे त्यावेळी विकास आणि आराध्य एकत्र पुढे गेलं पाहिजे, असं यावेळी पंतप्रधान म्हणाले आहेत.

पुढे पंतप्रधान यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, वीर सावरकरांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा ते तुकारामाचे अभंग गात असत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात तुकारामांनी मोठे कार्य केले आहे. सर्व पिढयांना तुकारामांचे अभंग प्रेरणा देतात. आषाढात पंढरपूर यात्रा आता सुरु होणार आहे. ह्या यात्रा आपल्या समाजासाठी गतीशीलतेसारख्या आहेत. एक भारत, एक राष्ट्र यासाठी या यात्रा पूरक आहेत. यात्रा विविधतेला पूरक आहेत, असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

संत तुकाराम शिळामंदिर हे भक्ती आणि ज्ञानाचा आधार

वट पौर्णिमेसंबंधित वक्तव्यानंतर रुपाली चाकणकरांवर होतेय टीका

प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. प्रकाश बाबा आमटे रुग्णालयात

भारतातील वेबसाईट्सवर हॅकर्सचा हल्ला

यावेळी पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील राममंदिराचाही उल्लेख केला आहे.अयोध्येत राममंदिर होते आहे. काशी विश्वनाथ स्वरुप बदलले आहे. सोमनाथमध्येही चांगले कार्य झालेले आहे. तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळाचा विकास केला जातोय. गरिबांसाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवतं आहे. या योजना शंभर टक्क्यांपर्यंत यशस्वी करायच्या आहेत. पर्यावरण, जलसंवर्धन, नद्यासाठी प्रयत्न, स्वस्थ भारत हा संकल्प, शंभर टक्के पूर्ण करायचे. यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत. प्लास्टिकमुक्तीचा संकल्प, नदी-तलावे साफ करण्याचा संकल्प केला तर देश नेहमी स्वच्छ राहील, असा सल्ला मोदींनी दिला आहे. येणारा २१ जूनचा योग दिवस उत्साहाने साजरा करा, असा संदेश पंतप्रधान मोदींनी दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा