पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला असून आता ते आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची स्वतःची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि दूरदृष्टी यावरून ओळख बनवली आहे. शिवाय देशाच्या विकासासाठी ते अहोरात्र काम करत असल्याच्या चर्चा असतात. जास्तीत जास्त काळ ते काम करत असतात. त्यांच्या कार्य पद्धतीची एक अनोखी माहिती आरटीआय मधून सर्वसामान्यांपर्यंत समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी किती काम करतात आणि ते सुट्टी कधी घेतात या बहुचर्चित प्रश्नांची उत्तरे आता आरटीआयच्या माध्यमातून समोर आली आहेत. पुण्यातील आयटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी आरटीआय अर्ज सादर करून पंतप्रधान किती सुट्ट्या घेतात अशी पंतप्रधान कार्यालयाकडे विचारणा केली होती.
कोणते प्रश्न विचारले होते?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंत भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या PMO (नवी दिल्ली) येथील कार्यालयात किती दिवस हजेरी राहिले?
भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित असलेल्या आणि विविध कार्यक्रम आणि कार्यक्रमांना उपस्थित राहिलेल्या दिवसांची माहिती शेअर करा.
आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी एकही सुट्टी घेतलेली नाही, असे उत्तर पंतप्रधान कार्यालयाकडून पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात आले आहे. तर, गेल्या ९ वर्षांत त्यांनी देश- विदेशातील ३ हजारहून अधिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे, असं उत्तर दुसऱ्या प्रश्नाचे देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतत कामावर असतात. तर, पदभार स्वीकारल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. पीएमओने म्हणजेच पंतप्रधान कार्यालयाने ३१ जुलै २०२३ रोजी हे उत्तर दिले आहे.
हे ही वाचा:
‘वंदे भारत’ चीन सीमेपर्यंत धावणार
सूर्याच्या सर्वात वरच्या ‘करोना’ स्तराचे तापमान २० लाख डिग्री
बलात्कारी, मारेकरी मुलाविरुद्ध आईनेच साक्ष दिली; झाली जन्मठेपेची शिक्षा
पवईत एअर होस्टेसची हत्या, फ्लॅटमध्ये मिळाला मृतदेह
यापूर्वी २०१५ मध्येही पंतप्रधान कार्यालयाकडून पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीबाबत आरटीआयद्वारे उत्तर मागवण्यात आलं होतं. तेव्हाही पंतप्रधान मोदी यांनी सुट्टी घेतली नसल्याची माहिती देण्यात आली होती. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी २०२१ मध्ये सांगितले होते की, नरेंद्र मोदींनी त्यांच्या २० वर्षांच्या राजकीय प्रवासात एकही रजा घेतली नाही.