पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक स्तरावरील लोकप्रिय राजकीय व्यक्तिमत्त्व आहेच, पण त्यांच्या या लोकप्रियतेमुळे त्यांनी आपल्या पक्षात यावे अशी विनंती कुणी केली तर…
इस्रायलच्या पंतप्रधानांनी मात्र अशी विनंती करत मोदींना आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोदींच्या लोकप्रियतेवर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले असे म्हणता येईल.
Cop-26 या ग्लास्गो येथील परिषदेत इस्रायलचे नाफ्ताली बेनेट यांनी मोदी यांची भेट घेऊन त्यांना चक्क आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिले. ही बाब जागतिक स्तरावर चांगलीच व्हायरल झाली.
या दोन नेत्यांनी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली आणि दोन्ही देशातील विकासाच्या वेगवेगळ्या योजनांबाबत देवाणघेवाण कशी करता येईल, याचा आढावा घेतला. त्यावेळी बेनेट यांनी पंतप्रधान मोदी यांना म्हटले की, तुम्ही इस्रायलमध्ये प्रचंड लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहात तर तुम्ही आमच्या पक्षात का प्रवेश करत नाही. त्यानंतर हा व्हीडिओ इस्रायलच्या शिष्टमंडळाचे अमिचाई स्टाइन यांनी व्हायरल केला. त्यात पंतप्रधान मोदी आणि बेनेट एकमेकांशी हस्तांदोलन करता करता हास्यविनोद करत आहेत. बेनेट यांनी मोदींना उपरोक्त विनंती केल्यावर मोदींनी त्याला हसत प्रतिसाद दिला.
Israel's PM Bennett to @narendramodi: You are the most popular man in Israel. Come and join my party pic.twitter.com/0VH4jWF9dK
— Amichai Stein (@AmichaiStein1) November 2, 2021
यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले की, इस्राएलच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदीजींच्या त्यांच्या देशातील लोकप्रियतेची ग्वाही देऊन आपल्या पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले आहे. “विश्वनेता” या एकाच शब्दात मोदीजींचे अचूक वर्णन करता येईल.
हे ही वाचा:
ग्लास्गोमध्येही पंतप्रधान मोदींचे कलम ३७० हटवण्यासाठी कौतुक
फडके रोड राहणार सुना सुना, जमावबंदी लागू
स्वातंत्र्यवीरांवर होणाऱ्या क्षमापत्रांच्या आरोपाचे सप्रमाण खंडन करणारे अक्षय जोग यांचे नवे पुस्तक
नरक चतुर्दशीला काय करावे? अभ्यंग स्नानाचे महत्व
पुढील वर्षी भारत आणि इस्रायल यांच्यातील परराष्ट्र संबंधांची ३० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी बेनेट यांना भारतभेटीचे आमंत्रणही दिले आहे. त्यावेळी बेनेट यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की, भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंध असे वृद्धिंगत राहावेत. या नात्याने एक नवी उंची गाठावी अशी अपेक्षा बेनेट यांनी व्यक्त केली. बेनेट म्हणाले की, भारत आणि ज्यू संस्कृती यांच्यातील संबंध दृढ होण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतलात त्याबद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत. या नव्या भूमिकेबद्दल आम्ही इस्रायलच्या जनतेच्या वतीने आपले अभिनंदन करतो.
इस्राएलच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदीजींच्या त्यांच्या देशातील लोकप्रियतेची ग्वाही देऊन आपल्या पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले आहे.
"विश्वनेता" या एकाच शब्दात मोदीजींचे अचूक वर्णन करता येईल. pic.twitter.com/t1q7PAwQfP— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 3, 2021