27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरअर्थजगत'काँग्रेस राजवटीत एअर इंडियाची घोटाळ्यांसाठी होती ओळख'

‘काँग्रेस राजवटीत एअर इंडियाची घोटाळ्यांसाठी होती ओळख’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते कर्नाटकातील शिवमोग्गा विमानतळासह ३,६०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधांनी काँग्रेस सरकारच्या विमान क्षेत्रातील कामगिरीवरून निशाणा साधला

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकदिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान पीएम मोदींनी शिवमोग्गा येथील विमानतळासह ३,६०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. काँग्रेस राजवटीत एअर इंडिया घोटाळ्यांसाठी, तोट्यात चालणारा व्यवसाय मॉडेल म्हणून ओळखली जात होती, परंतु आज एअर इंडिया भारताच्या नव्या सामर्थ्याच्या रूपाने जगात नवीन ऊंची गाठत आहे, नवीन उड्डाण घेत आहे. आज जगभरात भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राचा डंका वाजत आहे असा जोरदार टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला.

पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की , गाडी असो की सरकार त्याला डबल इंजिन लागते तेव्हा त्याचा वेग अनेक पटींनी वाढतो. यापूर्वी जेव्हा कर्नाटकच्या विकासाची चर्चा होत होती, तेव्हा ती मोठ्या शहरांपुरती मर्यादित होती. परंतु आमचे सरकार कर्नाटकातील खेड्यापाड्यांपर्यंत, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांपर्यंत विकास नेण्याचे काम करत आहे.

छोटी शहरेही हवाई संपर्काने जोडली गेली पाहिजेत, असा विचार काँग्रेसच्या मनात कधीच नव्हता असा निशाणा साधत पंतप्रधानांनी आज देशातील अनेक लहान शहरांमध्ये आधुनिक विमानतळ आहेत. भाजप सरकार किती वेगाने काम करत आहे, याची तुम्ही कल्पना करू शकता याकडे लक्ष वेधले.

हे ही वाचा:

व्हीपला आम्ही मानणार नाही, आम्ही घाबरत नाही… ठाकरे गटाचा पवित्रा

संशयास्पद व्यक्तीवर लक्ष ठेवा!! NIAने केले मुंबई पोलिसांना सतर्क

केरळच्या मंदिरात आता झुलणार रोबोटिक हत्ती

मरीन ड्राइव्ह वरून वरळीला जा अवघ्या आठ मिनिटांत , तेही टोलशिवाय.

आज शिवमोग्गाला स्वत:चे विमानतळ मिळाले आहे, ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती, ती आज पूर्ण झाली आहे. शिवमोग्गा विमानतळ अतिशय भव्य आणि अतिशय सुंदर आहे. हे केवळ विमानतळ नसून या भागातील लोकांच्या स्वप्नांच्या नव्या उड्डाणाची मोहीम आहे. भारताची कीर्ती जगभर वाजत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. डबल इंजिन सरकारच्या काळात कर्नाटकचा वेगाने विकास होत असून विकासाचा रथ प्रगतीच्या मार्गावर पुढे सरकत आहे.  या विमानतळामुळे शिवमोग्गा आणि मलनाड प्रदेशातील इतर शेजारील भागांशी संपर्क जोडणे शक्य होणार आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा