प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदी यांना धोका; गुप्तचर यंत्रणांकडून माहिती

प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदी यांना धोका; गुप्तचर यंत्रणांकडून माहिती

Indian Prime Minister Narendra Modi (2L) arrives ahead of the 68th Republic Day Parade in New Delhi on January 25, 2017. Crown Prince of Abu Dhabi Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan is the chief guest of honour at India's 68th Republic Day celebrations. / AFP PHOTO / Money SHARMA

सुरक्षा यंत्रणांच्या अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांना प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे. ‘इंडिया टुडे’ने गुप्तचर यंत्रणांच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर हे वृत्त दिले आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील गटांकडून या हल्ल्यासंदर्भातील कट रचण्यात आल्याचे संकेत गुप्तचर यंत्रणांना मिळाले आहेत. माहितीनुसार, मान्यवरांबरोबरच सार्वजनिक ठिकाणे, महत्वाच्या इमारती आणि गर्दीच्या ठिकाणांवर हल्ला करण्याचा या दहशतवादी गटांचा विचार असल्याचे अहवालात म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिजस्तान आणि तझाकिस्तान या देशांच्या नेत्यांचा समावेश असू शकतो अशी माहिती आहे.

हे ही वाचा:

‘नानाभाऊ शारीरिक उंची असून चालत नाही, बौद्धिक उंची पण हवी’

किरण माने प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री

‘भारतात गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ’

अफगाणिस्तान भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; २६ जणांचा मृत्यू

लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हरकत-उल-मुजाहिदीन, द रियान्सर फोर्स आणि हिजबुल्ल मुजाहिद्दीन सारख्या गटांचा या कटामागे हात असल्याचे वृत्त आहे. खलिस्तानवादी गटांकडूनही पाकिस्तानमध्ये या कटाच्या पार्श्वभूमीवर हलचाली सुरु असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, प्रजासत्तादिनाच्या पार्श्वभूमिवर सुरक्षा यंत्रणांनी तयारी सूरू केली आहे.

Exit mobile version