गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये आहेत. पंतप्रधान मोदी अनेक सभा घेत आहेत. यादरम्यान मेहसाणा येथे झालेल्या सभेत त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. ‘काँग्रेस मॉडेल’चा अर्थ घराणेशाही, जातीयवाद, वंशवाद आणि मतपेढीचे राजकारण असा होतो. मतपेढीचे राजकारण करण्यासाठी आणि सत्तेत राहण्यासाठी लोकांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी काँग्रेस ओळखले जाते, असा घणाघात मोदींनी केला आहे.
काँग्रेसने केवळ गुजरातच नाही तर संपूर्ण देश उद्ध्वस्त केला आहे. त्यामुळेच आज देशाला पुढे नेण्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम करावे लागत आहेत. भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की, ज्याला व्यक्तीपेक्षा पक्ष आणि पक्षापेक्षा देश मोठा वाटतो. हीच आमची संस्कृती आहे आणि आम्ही याच संस्कृतीच्या साथीने काम करत आहोत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
काँग्रेस हा फक्त जातीयवाद, घराणेशाही आणि वंशवादाचा पुरस्कर्ता आहे. काँग्रेस मॉडेल म्हणजे कोट्यवधींचा भ्रष्टाचार. पण हे सगळं बाजूला ठेऊन आजची युवा पिढी पुढे जात आहे. युवा पिढी डोळस असून, ती आंधळा विश्वास ठेवत नाही तर काम करणाऱ्यांचे मूल्यांकन करीत पुढे जात आहे, असे मोदींनी नमूद केले.
हे ही वाचा :
दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे नव्हतेच, मग तो मृत्यू अपघाती असल्याचा दावा कुणाचा?
शौचालयाच्या स्वच्छतेसाठी वापरावे लागते खारे पाणी
‘स्निफर’ डॉग ठेवणार आता परदेशी टपालावर नजर
लोकांची सेवा करतोय तोपर्यंत सरकार टिकेल
पुढे गुजरात विकासाबद्दल बोलताना मोदी म्हणाले, वीस वर्षांपूर्वी येथे ५५ लाख वीज जोडण्या होत्या. आज ही संख्या दोन कोटींपेक्षा जास्त आहे. कारण वीज जोडणीसाठी लोकांना भ्रष्टाचाराचा सामना करावा लागत नाही. येथे लोक पाण्याच्या एका थेंबासाठी तहानलेले होते, तेथे आता नर्मदेचे पाणी घराघरांत पोहचले आहे. विकासकामे करण्यासाठी भाजपा सत्तेवर आला होता. एवढ्या वर्षांत आम्ही इतका विकास केला आहे की, विरोधकांनाही आम्हाला सवाल करण्यास संकोच वाटतो.