पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी सुनावले खडे बोल

पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी सुनावले खडे बोल

भारताचा शेजारील देश पाकिस्तानमध्ये अखेर राजकीय नाट्यमय घडामोडींनंतर पंतप्रधान म्हणून शहबाझ शरीफ यांची वर्णी लागली आहे. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात शहबाझ शरीफ यांनी भारतासंदर्भात वक्तव्य केले आहे. त्यांनी आपल्या भाषणात काश्मीरबाबतचा अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, दुसरीकडे शरीफ यांच्या भाषणानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवरुन शहबाझ शरीफ यांना शुभेच्छा देताना त्यांच्या भूमिकेबद्दल खडसावले आहे.

त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शरीफ यांचे अभिनंदन केले. “पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल एच. ई. मियान मोहम्मद शहबाझ शरीफ यांचे अभिनंदन. भारताला या प्रांतामध्ये शांतता आणि स्थैर्य अपेक्षित असून हा प्रांत दहशतवादमुक्त राहील अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास आपण विकास कामांमधील आव्हानांवर लक्ष केंद्रित करु शकू आणि त्या माध्यमातून आपल्या लोकांचे भले करण्याबरोबरच संपन्नता प्रदान करता येईल,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना!

गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीत २ दिवसांची वाढ

५८ कोटी कुठले, एवढेच पैसे दिले सोमय्यांनी

‘मुंबईची पुन्हा होणार तुंबई; फक्त ७५ टक्के नालेसफाई करण्याचे टेंडर’

शहबाझ शरीफ आपल्या भाषणात म्हणाले होते की, “आपले शेजारी आपल्याला निवडता येत नाहीत, आपल्याला त्यांच्यासोबत राहावेच लागते आणि पाकिस्तानच्या निर्मितीपासून आमचे भारतासोबते संबंध दुर्दैवाने कधीही चांगले राहिलेले नाहीत,” असे शहबाझ म्हणाले. “काश्मीर खोऱ्यातील लोक रक्ताळलेले असून, पाकिस्तान त्यांना ‘राजनैतिक व नैतिक पाठिंबा’ देईल, तसेच हा मुद्दा प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित केला जाईल,” असे ते म्हणाले. तसेच ऑगस्ट २०१९ मध्ये भारताने अनुच्छेद ३७० रद्द केला तेव्हा इम्रान खान यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत, असे आरोप शरीफ यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर केले.

Exit mobile version