ओमिक्रोन विरुद्धच्या लढाईसाठी मोदींची ‘पंचसूत्री’

ओमिक्रोन विरुद्धच्या लढाईसाठी मोदींची ‘पंचसूत्री’

दक्षिण आफ्रिकेतून जगभरात पसरणारा ओमिक्रोन व्हेरियंट आता देशभरात फोफावताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी २३ डिसेंबर रोजी कोरोना परिस्थिती आणि ओमिक्रोनचा संभाव्य धोका यांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत मोदींनी विषाणूचा नवीन प्रकार लक्षात घेता आपण सतर्क आणि सावधान रहायला हवे, असे निर्देश दिले. महामारी विरुद्धचा लढा अद्याप संपलेला नाही त्यामुळे कोरोना संबंधीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.

ओमिक्रोनमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी जिल्हा स्तरापासून सुरुवात करून राज्यांमधील आरोग्य यंत्रणा बळकट असल्याची खात्री करून घेण्याचे  निर्देश पंतप्रधानांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. तसेच ऑक्सिजन पुरवठा उपकरणांची उपलब्धता आणि ती   पूर्णपणे कार्यरत आहेत याची राज्यांनी खात्री करून घेणे  महत्त्वाचे असल्याचे मोदींनी बैठकीत सांगितले.

हे ही वाचा:

ठाकरेंची एन्ट्री, राणेंचे ‘म्याव म्याव’

लुधियाना जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट

पेंग्विन बाळाच्या बारशात मश्गुल असणाऱ्यांना बालमृत्युंचे सोयरसुतक नाही!

उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे मागील सरकारचे पाप

ओमिक्रोनमुळे नव्याने निर्माण होणाऱ्या हॉटस्पॉट्सवर प्रभावी देखरेख करावी, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पॉझिटिव्ह नमुने तातडीने पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच केंद्र सरकारने वाढती रुग्णसंख्या, अपुऱ्या  आरोग्य विषयक पायाभूत सुविधा आणि कमी लसीकरण असलेल्या राज्यांमध्ये मदत करण्यासाठी पथके पाठवावीत असेही पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी देशातील कोरोना रुग्ण, ओमिक्रोन बाधित, लसीकरण आदी सर्व बाबींचा आढावा घेतला.

ओमिक्रोन विरुद्ध लढण्यासाठी केंद्राकडून देण्यात आलेली पंचसुत्री

Exit mobile version