पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर

पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अजून एका आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांना भारताचा शेजारील देश भूतानने त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. भूतानच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘Ngadag Pel gi Khorlo’ देण्यात येणार असल्याचे ट्विट करून सांगितले आहे.

भूतानचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देताना अत्यंत आनंद होत असल्याचे भूतानने म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विशेषत: कोरोनाच्या संकटात कोणत्याही अटींशिवाय मोदींनी दिलेला मैत्रीपूर्ण मदतीचा हात खूपच महत्त्वाचा ठरला. दोन्ही देशांमध्ये अनेकदा संवाद झाला. मोदी महान असून ते धार्मिकही आहेत. भूतानच्या सर्व नागरिकांकडून मोदीजींचे अभिनंदन. त्यांचा गौरव करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, अशा भावना भूतानने व्यक्त केल्या आहेत.

हे ही वाचा:

शिवसेनेला ठेंगा, निधी वाटपात राष्ट्रवादी, काँग्रेसची बाजी

महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक

‘या’ तारखेपासून होणार दहावी- बारावीच्या परीक्षा

शरद पवार वाचणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र!

भारत हा यापूर्वीही कोरोना काळात, संकटसमयी अनेक देशांच्या पाठीशी उभा राहिला असून मदतीचा हातही पुढे केला आहे. काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने ओमिक्रॉन प्रभावित झालेल्या आफ्रिकन देशांना कोरोना प्रतिबंधक लस, पीपीई किट आणि इतर साहित्य पुरवण्याचा निर्णय जाहीर केला होता. भारत सरकारच्या या निर्णयाचं क्रिकेटपटू केविन पीटरसन याने कौतुक केले होते आणि आभारही मानले होते.

Exit mobile version