पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगींचा फोटो कचऱ्यात, कर्मचाऱ्याने गमावली नोकरी

पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगींचा फोटो कचऱ्यात, कर्मचाऱ्याने गमावली नोकरी

उत्तर प्रदेशमधील एका सफाई कर्मचाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो कचरा गाडीत टाकले. त्याच्या या कृत्यामुळे त्याच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. एक सफाई कर्मचारीपंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचे फोटो कचरा गाडीमध्ये घेऊन जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.

उत्तर प्रदेशमधील मथुरा वृंदावन महानगरपालिका क्षेत्रात पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचे फोटो कचऱ्यात टाकण्यात आले होते. सफाई करत असताना सफाई कर्मचाऱ्याने हे फोटो कचरा गाडीत टाकले. जेव्हा तो कचरा गाडी घेऊन जात होता तेव्हा लोकांनी त्याला फोटोबाबत विचारले. त्यावर त्याने, फोटो अगोदरच कचऱ्यात होते, असे स्पष्टीकरण दिले.

हे ही वाचा:

शेलार म्हणाले, ख्वाजा चिस्तीच्या हत्या प्रकरणाची चौकशी करा!

महाविकास आघाडीच्या काळात राज्यात तब्बल २२ हजार ७५१ बालमृत्यू

भारतात लसीकरणाचा आकडा १८ महिन्यात २०० कोटीपार

इंडिगो विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग

संतप्त झालेल्या लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेतल्यानंतर सफाई कर्मचाऱ्याने हे फोटो लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे फोटो कचारा गाडीत घेऊन जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. येथील अतिरिक्त महापालिका आयुक्त सत्येंद्र तिवरी यांनी व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version