पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जूनला गुजरातमधील गांधीनगरला जाणार आहेत. याचे कारण कोणता राजकीय दौरा नसून, त्या दिवशी त्यांच्या आईचा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आई हीराबेन १८ जून रोजी शंभर वर्षांच्या होणार आहेत. या खास दिवशी पंतप्रधान मोदी त्यांच्यासोबत असणार आहेत.
हीराबेन यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात पूजा ठेवण्यात आली असून त्यात पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी सुंदरकांड, शिवपूजा व भजन संध्याचा त्रिवेणी कार्यक्रम होणार आहे. याशिवाय पावागढ येथील माँ काली मंदिरात पंतप्रधान मोदी ध्वजारोहण करणार आहेत. त्याचवेळी पंतप्रधान वडोदरा येथे जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत.
हे ही वाचा:
‘ शंभर पाप करून, मांजर म्याव म्याव करायला अयोध्येला’
१८ तास चौकशीनंतर राहुल गांधींची आज पुन्हा चौकशी
आयपीएल मीडिया राईट्सच्या लिलावातून बीसीसीआयने कमावले इतके रुपये
संत तुकाराम शिळामंदिर हे भक्ती आणि ज्ञानाचा आधार
यापूर्वी पंतप्रधान मोदींनी मार्चमध्ये त्यांची आई हीराबेन यांची भेट घेतली होती. त्यांनी आई हिराबेन यांची गांधीनगर येथील निवासस्थानी भेट घेतली होती. पंतप्रधानांच्या दौऱ्याची भाजपाकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पावागड दौऱ्यावर येत असताना, पंतप्रधान मोदी मंदिरापर्यंत जाण्यासाठी पहिली लिफ्ट सेवा सुरू करणार आहेत. याशिवाय ते वडोदरा येथे दोन वेगवेगळ्या परिषदांना संबोधित करणार आहेत. याशिवाय पंतप्रधान महिलांच्या एका कार्यक्रमालाही संबोधित करणार आहेत.