गुलामीनंतर आपल्या भारताने अनेक गोष्टी गमावल्या पण नवी यात्रा सुरू केली. पण ती यात्रा किती तरी चढउतारांना पाहात, आव्हानांवर मात करत स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या अमृतकाळात प्रवेशकर्ती झाली आहे. स्वातंत्र्याचा हा अमृतकाल देशाला नवी दिशा देणारा अमृतकाल आहे, अनंत स्वप्नांना, असंख्य आकांक्षांना पूर्ण करणारा अमृतकाल आहे. या अमृतकालाचे आवाहन आहे की, मुक्त मात्र भूमी को नवीन पान चाहिए, नवीन पर्व के लिए नवीन प्राण चाहिए. मुक्तगीत गीत हो रहा नवीन राग चाहिए नवीन पर्व के लिए नवीन पर्व चाहिए, अशा कणखर शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या उभारणीमागील प्रेरणा विषद केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाल्यानंतर सभागृहात त्यांनी देशाला संबोधित केले. तेव्हा प्रखर वाणीतून त्यांनी या नव्या संसद भवनाची निर्मितीमागील प्रेरणा काय आहे, हे स्पष्ट केले.
ते म्हणाले की, नवे संसद भवन हे फक्त एक भवन नाही तर १४० कोटींच्या भारतीयांच्या आकांक्षा, स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. हे जगाला भारताच्या दृढसंकल्पाचे संदेश देणारे आमच्या लोकशाहीचे मंदिर आहे. नवे संसद भवन योजनेला यथार्थशी, नीतीला निर्माणशी इच्छाशक्तीला क्रियाशक्तीची संकल्पाला सिद्धीशी जोडणारा दुवा म्हटले जाईल. मोदी म्हणाले की, आज नवा भारत नवी लक्ष्य निश्चित करतो आहे, नवे मार्ग तयार करतो आहे. नवा विचार, दिशा नवी आहे संकल्प नवा आहे विश्वास नवा आहे. आज पुन्हा एकदा पूर्ण जग भारताला, भारताच्या संकल्पाच्या दृढतेला, भारतवासियांच्या प्रखरतेला भारतीय जनशक्तीला आदर व आशेने पाहात आहे.
मोदींनी ठामपणे सांगितले की, जेव्हा भारत पुढे जातो तेव्हा विश्व पुढे जाते. संसदेचे हे नवे भवन भारताच्या विकासाकडून विश्वाच्या विकासाचेही आवाहन करेल.
सेंगोल आपल्याला प्रेरणा देत राहील
आज या ऐतिहासिक क्षणी काही काळ आधी संसदेच्या नव्या इमारतीत पवित्र सेंगोलची स्थापना झाली आहे. महान चोल साम्राज्यात सेंगोलला कर्तव्यपथचे, सेवापथचा, राष्ट्रपथचे प्रतीक मानले जात असे. राजाजी आणि अधिनम यांच्या मार्गदर्शनाखाली हे सेंगोल सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक बनले होते. त्यांच्या मार्गदर्शाखाली लोकसभेत हे पवित्र सेंगोल स्थापित झआले. मला वाटते की, हे आपले भाग्य आहे की या पवित्र सेंगोलला आपण त्याची मानमर्यादा परत केली आहे, सन्मान परत केला आहे. जेव्हा संसदेत कार्यवाही सुरू होईल. हा सेंगोल आपल्याला प्रेरणा देत राहील.
हे ही वाचा:
म्हणून गरज होती नव्या संसद भवनाची !…माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितले कारण
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र घराघरात पोहोचवले पाहिजे!
पंतप्रधान आज नव्या संसद भवनाचे करणार लोकार्पण
पीएफआयवरील बंदीच्या रागातून गडकरींना केले ‘टार्गेट’
लोकशाहीच्या प्रेरणेची प्रतिनिधी म्हणजे संसद
आमचे वेद आम्हाला लोकशाहीवादी आदर्श शिकवतात. महाभारताच्या ग्रंथात गण आणि गणतंत्रचा उल्लेख आढळतो. वैशालीसारख्या गणतंत्राला आपण पाहिले आहे. बसवेश्वर अनुभव मंटपाला आपण आपला गौरव मानले आहे. तामिळनाडूत सापडलेल्या इ.स. ९००चा शिलालेख आपल्याला आश्चर्यचकित करतो. लोकशाहीच आपली प्रेरणा आहे, संविधानच आपला संकल्प आहे. ही प्रेरणा, संकल्प याची श्रेष्ठ प्रतिनिधी कोण आहे तर ही संसद आहे. ही संसद देशाच्या ज्या समृद्ध संस्कृतीची प्रतिनिधित्व करते, उद्घोष करते.