पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर नऊ कोटी फॉलोअर

२०२०मध्ये पंतप्रधान म्हणून मोदी यांनी सहा कोटी फॉलोअरचा टप्पा गाठला होता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर नऊ कोटी फॉलोअर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर नऊ कोटी फॉलोअर्स झाले आहेत. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर असणाऱ्या राजकीय व्यक्तींपैकी ते एक ठरले आहेत. अर्थात सर्वाधिक फॉलोअर असणाऱ्या भारतीयांमध्ये ते अव्वल स्थानी आहेत. त्यांच्या फॉलोअरच्या यादीत ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क आहेत. ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर असणाऱ्या यादीत ते अव्वल स्थानी आहेत. ते एकूण १९५ जणांना फॉलो करतात. तर, पंतप्रधान मोदी ट्विटरवर दोन हजार ५८९ जणांना फॉलो करतात.

 

गुजरातचे मुख्यमंत्री असताना, सन २००९मध्ये पंतप्रधान मोदी ट्विटरवर आले होते. त्यानंतर वर्षभरातच त्यांचे एक लाख फॉलोअर झाले. जुलै, २०२०मध्ये पंतप्रधान म्हणून मोदी यांनी सहा कोटी फॉलोअरचा टप्पा गाठला. ‘वर्ल्ड ऑफ स्टॅटिटिक्स’ने ९ जुलै रोजी ही यादी जाहीर केली. त्यानुसार ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर असणाऱ्या जगभरातील पहिल्या १० व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदी हे एकमेव भारतीय आहेत. या यादीत मोदी आठव्या स्थानी आहेत. त्यांनी आठ कोटी ६६ लाख फॉलोअर असणारे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि आठ कोटी ४१ लाख फॉलोअर असणारी अमेरिकी गायिका आणि अभिनेत्री लेडी गागा यांना मागे टाकले आहे.

 

हे ही वाचा:

मणिपूर प्रकरणात सरकारने कठोर कारवाई केली नाही तर आम्ही निर्णय घेऊ

मणिपूर; महिलांची नग्न धिंड प्रकरणातील पहिल्या आरोपीला अटक !

पीओपीच्या गणेशमूर्तीकारांच्या पोटावर पाय देऊ नका

मणिपूरच्या घटनेमुळे मोदी संतापले

१४ कोटी ७० लाख फॉलोअरसह इलॉन मस्क या यादीत अव्वलस्थानी आहेत. तर, त्यामागोमाग १३ कोटी २१ लाख फॉलोअरसह अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा दुसऱ्या स्थानी आहेत. त्यामागोमाग ११ कोटी दहा लाख फॉलोअर असणारा गायक जस्टिन बिबर आणि १० कोटी ८९ लाख फॉलोअरसह फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याचा क्रमांक आहे. तर, जागतिक नेत्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे तीन कोटी ७३ लाख फॉलोअर असून ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे दोन कोटी फॉलोअर आहेत.

Exit mobile version