25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरराजकारणपंतप्रधानांची दक्षिण मोहीम; भाजपला ३० जागा मिळण्याची शक्यता

पंतप्रधानांची दक्षिण मोहीम; भाजपला ३० जागा मिळण्याची शक्यता

उत्तर भारतात काही जागा कमी झाल्या तर त्याची भरपाई दक्षिणेतून करण्याचा पक्षाचा मनसुबा

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दक्षिण भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. ते पुन्हा एकदा नऊ दिवसांच्या दौऱ्याला निघाले आहेत. या दौऱ्यात ते पूर्व भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंतचा प्रवास करतील. लोकसभा निवडणुकीत भाजपला कोणतीही कसर बाकी ठेवायची नाही. त्यामुळेच समजा उत्तर भारतात काही जागा कमी झाल्या तर त्याची भरपाई दक्षिणेतून करण्याचा पक्षाचा मनसुबा आहे. दक्षिण भारतात एकूण १३० जागा आहेत, ज्या सरकार स्थापनेसाठी महत्त्वाच्या आहेत. या दरम्यान इंडिया टीव्ही-सीएनएक्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भाजपला दक्षिण भारतात १३०पैकी ३० जागा मिळू शकतात.

भाजपने ३० जागा जिंकल्यास ही पक्षाची ऐतिहासिक कामगिरी ठरेल. भाजपने सन २०१४ आणि सन २०१९च्या निवडणुकीत अभूतपूर्व कामगिरी केली होती. तरीही भाजप हा पक्ष तेलंगण आणि कर्नाटकच्या बाहेर चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. मात्र या सर्वेक्षणानुसार, यंदा तमिळनाडू आणि केरळमध्येही भाजपला जागा मिळतील. इतकेच नव्हे तर काँग्रेसची सत्ता असणाऱ्या तेलंगणा आणि कर्नाटकमध्येही भाजपला मोठ्या संख्येने जागा मिळतील, असा या सर्वेक्षणाचा अंदाज आहे.

सर्वेक्षणानुसार, तमिळनाडूमध्ये भाजप केवळ खाते उघडणार नाही तर तिथे चार जागाही जिंकेल. काँग्रेसला येथे सहा जागा मिळू शकतात. तर, द्रमुक पक्षाला २० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, तेलंगणामध्ये भाजपला पाच जागा मिळतील आणि काँग्रेसला नऊ जागा मिळतील. बीआरएसला दोन जागा मिळतील, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. हैदराबादची जागा पुन्हा ओवैसी जिंकतील.

केरळमध्ये भाजपला तीन जागा मिळू शकतात. येथे सर्वाधिक सात जागा काँग्रेसला, चार सीपीएमला, एक सीपीआयला आणि मुस्लिम लीगला दोन जागा मिळू शकतात. आंध्र प्रदेशमध्ये मात्र भाजपचे खातेही उघडणार नाही. येथील एकूण २५ जागा व्हायएसआर काँग्रेस जिंकेल, तर १० जागा टीडीपीला मिळू शकतील. अर्थात हे दोन्ही पक्ष भाजपला समर्थन देणारे पक्ष आहेत.

हे ही वाचा:

रणजी ट्रॉफी: मध्य प्रदेशला नमवत विदर्भाची फायनलमध्ये उडी!

झारखंड: सर्व आरोपी अटक, स्पॅनिश जोडपे निघाले नेपाळला!

“प. बंगाल सरकारला संदेशखालीतील घटनेचा काहीही फरक नाही; आरोपींना वाचवण्यासाठी बळाचा वापर सुरूये”

वीर सावरकरांवर का बनवला चित्रपट?

कर्नाटक पुन्हा भाजपकडे?

कर्नाटकमधील २८ जागांपैकी २२ जागा पुन्हा भाजप जिंकू शकतो. सन २०१९मध्ये भाजपने येथे २५ जागा जिंकल्या होत्या. भाजपशी आघाडी करणाऱ्या जनता दल (संयुक्त) पक्षाला दोन जागा मिळू शकतात. अशा प्रकारे एनडीएला २४ जागा मिळू शकतात. तर, काँग्रेसला केवळ चार जागा मिळतील, असा अंदाज आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा