नरेंद्र मोदींचे नागरिकांना पंचभाषिक आवाहन

पाच राज्यांत आज मतदान होत आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना विक्रमी संख्येत मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे. त्यांनी हे आवाहन पाच भाषांमधून केले आहे.

नरेंद्र मोदींचे नागरिकांना पंचभाषिक आवाहन

आज पाच राज्यातील विधानसभेसाठी विविध टप्प्यातील मतदान पार पडत आहे. आसाम, बंगाल, तमिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ या राज्यांत मतदानाला आज सकाळी ७ वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या मतदानासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. मोदींनी बंगाली, मल्याळम, तमिळ आणि इंग्रजी भाषेत ट्वीट करून नागरिकांना मतदानासाठी आवाहन केले आहे.

हे ही वाचा:

सीबीआयचे पथक होणार मुंबईत दाखल

कोरोनाचा उद्रेक सुरूच

मोदींनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांत निवडणुका होत आहेत. मी नागरिकांना विशेषतः तरूणांना विक्रमी संख्येने मतदान करण्याची विनंती करतो.’

हेच ट्वीट मोदींनी बंगाली, मल्याळम, तमिळ आणि इंग्रजी भाषेतही केले आहे.

आसाम आणि बंगालमध्ये मतदानाचा तिसरा टप्पा पार पडत आहे. हाच आसाममधील शेवटचा टप्पा आहे, तर बंगालमध्ये अजून पाच टप्पे शिल्लक आहेत. तमिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये एकाच टप्प्यातील मतदान होणार आहे. केरळमध्ये भाजपाच्या वतीन पलक्कड मतदारसंघातून ‘मेट्रोमॅन’ नावाने प्रसिद्ध असेलेले इ. श्रीधरन निवडणूक लढवत आहेत.

मतदानासाठी कोविडच्या निर्बंधांचे कडक पालन केले जात आहे. या सर्व निवडणुकांची मतमोजणी २ मे रोजी होणार आहे.

Exit mobile version