पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडेमिर झेलेन्स्की यांच्यात आज, शनिवारी प्रथमच द्विपक्षीय चर्चा होणार आहे. जी ७ शिखर परिषदेच्या निमित्ताने जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी पंतप्रधानांना जपानभेटीचे आमंत्रण दिले असून तिथेच या दोघांची भेट होईल.
गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीपासून रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच वैयक्तिक भेट आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की हेदेखील जपानच्या निमंत्रणावरून शिखर परिषदेत सहभागी होत आहेत. युक्रेन संघर्ष सुरू झाल्यापासून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन तसेच राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी अनेकदा चर्चा केली आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर सौम्यपणे टीका करताना मोदी यांनी आता ‘युद्धाचे युग नाही’, असे त्यांना सप्टेंबरमध्ये सांगितले होते. या संघर्षावर मुत्सद्दीपणे तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. हिंसाचार थांबवून संवादातून समस्या सोडवला जावा, असा आग्रह मोदी यांनी धरला होता.
हे ही वाचा:
दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची काय आहेत कारणे?
इम्रानच्या घरातून दंगलखोरांना पकडायला गेले, चहाबिस्कीट खाऊन परतले
केजरीवाल यांच्या आनंदावर केंद्र सरकारने फिरवला बोळा
समीर वानखेडे यांना हायकोर्टाकडून दिलासा !
गेल्या वर्षी ४ ऑक्टोबर रोजी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणात, पंतप्रधान मोदी यांनी संघर्षावर कोणताही लष्करी उपाय असू शकत नाही, असे ठाम प्रतिपादन करत भारत कोणत्याही शांतता प्रयत्नांमध्ये योगदान देण्यास तयार आहे, अशी ग्वाही दिली होती. मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या माध्यमातून हे संकट सोडवले जावे, असे ठाम मत भारतातर्फे मांडण्यात आले होते.
पंतप्रधान मोदी सात गटांच्या (जी ७) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये आहेत. पंतप्रधान त्यांचे जपानी समकक्ष फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून पूर्व आशियाई देशाला भेट देत आहेत. शक्तिशाली गटाचे सध्याचे अध्यक्ष म्हणून जपान जी ७ शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. मोदी हे २१ मेपर्यंत शिखर परिषदेसाठी हिरोशिमा येथे असतील. अन्न, खत आणि ऊर्जा सुरक्षेसह जागतिक आव्हानांवर ते बोलतील, अशी अपेक्षा आहे. यावेळी मोदी हे जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, या देशांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत आणि शनिवारी क्वाड समिटच्या पुढे फ्रान्स ते कोरिया प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांना भेटतील. तसेच, व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचीही भेट घेतील.