30 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारणपाच वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी २०२३च्या अविश्वास प्रस्तावाची भविष्यवाणी केली होती...

पाच वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी २०२३च्या अविश्वास प्रस्तावाची भविष्यवाणी केली होती…

विरोधकांनी अविश्वास ठराव आणल्यानंतर जागी झाली २०१९ची आठवण

Google News Follow

Related

बुधवारी विरोधी पक्षांनी केंद्राविरुद्ध लोकसभेत अविश्वास प्रस्तावाची मागणी करणारी नोटीस सादर केल्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मधील अशा प्रस्तावाला दिलेले उत्तर व्हायरल झाले आहे ज्यात त्यांनी २०२३ मध्येही अशाच प्रकारचा अजून एक अविश्वासदर्शक ठराव मांडण्याची संधी तुम्हाला मिळो, अशा उपरोधिक शुभेच्छा देताना विरोधी पक्षांवर लोकसभेत जोरदार हल्ला चढवला होता.

 

 

“मी तुम्हाला माझ्या शुभेच्छा पाठवू इच्छितो की तुम्ही इतकी तयारी करा की तुम्हाला 2023 मध्ये पुन्हा अविश्वास आणण्याची संधी मिळेल,” २०१८ मध्ये लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधानांनी विरोधी पक्षांची या शब्दात खिल्ली उडवली होती.

 

हे ही वाचा:

‘इंडिया’ आघाडीच्या अध्यक्षतेसाठी काँग्रेस दावा करण्याची शक्यता

काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणात चार वर्षांचा तुरुंगवास

गांग बेपत्ता, वांग यांना नवा पत्ता; चीनचे परराष्ट्रमंत्री

अबब!! ऍप्पलचे बूट तेही ४० लाखांचे!

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मोदींच्या २०१८ सालच्या या भाषणाचा भाग शेअर केला आहे. विरोधी सदस्याला प्रत्युत्तर देताना, पंतप्रधान मोदी त्यात म्हणाले होते की, ज्या काँग्रेसचे कधी काळी ४०० खासदार निवडून आले होते, त्यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने अवघे ४४ खासदार दिले. हा काँग्रेसच्या उपजत अहंकाराचा परिणाम आहे.

 

 

काँग्रेस, बीआरएस कडून केंद्र सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीने (BRS) बुधवारी मणिपूर मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी करणाऱ्या नोटिसा लोकसभा अध्यक्षांकडे सादर केल्या. काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई यांनी लोकसभा महासचिव कार्यालयात नोटीस सादर केली आहे.

 

 

भारत राष्ट्र समिती (BRS) चे तळाचे नेते नागेश्वर राव यांनी अविश्वास प्रस्तावाची स्वतंत्र सूचना सभापतींना सादर केली होती. बीआरएसचे नेतृत्व तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव करत आहेत. विरोधी पक्ष मणिपूरमधील हिंसाचाराचा वापर करून भाजप सरकारला सर्व आघाड्यांवर घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच पंतप्रधान मोदींनी मणिपूरमधील हिंसाचारावर बोलण्याची मागणी विरोधी पक्ष करत आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर पंतप्रधान मोदींनी सभागृहात बोलावे, अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना फटकारले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा