23 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरराजकारणपंतप्रधानांनी पाहिले नवे संसदभवन... भव्य, सुसज्ज आणि नव्या रंगरूपात

पंतप्रधानांनी पाहिले नवे संसदभवन… भव्य, सुसज्ज आणि नव्या रंगरूपात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली अचानक भेट आणि घेतली माहिती

Google News Follow

Related

भव्य अशा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक भाग असलेल्या नव्या संसदभवनाच्या इमारतीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री अचानक भेट दिली आणि तिथल्या कामाची पाहणी केली. ही वास्तू आता जवळपास पूर्ण झालेली आहे. पंतप्रधानांनी तासभर या वास्तूची पाहणी केली.

पंतप्रधानांनी यावेळी तिथल्या कर्मचारी, मजूर यांच्याशी चर्चा केली. शिवाय, तिथे कशापद्धतीने काम चालले आहे, याची माहिती करून घेतली. नव्या लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहांचीही पाहणी त्यांनी केली. त्यांची छायाचित्रे पाहता हे काम जवळपास पूर्णत्वास आलेले आहे, असे दिसते. लोकसभा आणि राज्यसभा सभागृहांसाठी विशिष्ट रंगाची संकल्पना राबविण्यात आली आहे. लोकसभेसाठी जे कार्पेट अंथरलेले आहे ते हिरव्या रंगाचे आहे तर राज्यसभेसाठी ते लाल रंगाचे आहे.

हे ही वाचा:

रामनवमीचा सण देशभरात आनंदाने साजरा

राहुल यांचे शत्रू पवारांचे मित्र कसे?

संभाजीनगर राड्यातील आरोपींचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले

छत कोसळून ४० फूट खोल विहिरीत पडले, १३ जणांचा मृत्यू

जुन्या सभागृहात सदस्यांना बसण्यासाठी केवळ व्यवस्था आहे तर पहिल्या दोन ओळीतील सदस्यांना डेस्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत पण नव्या रचनेनुसार सभागृहात येणाऱ्या प्रत्येक सदस्याला आता डेस्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्या डेस्कमध्ये वेगवेगळी कनेक्शन्स देण्यात आली आहेत. त्यामुळे सगळ्या सदस्यांना आपली कामे अधिक सुलभरीतिने करता येतील.

जुन्या लोकसभा सभागृहाच्या तुलनेत नवे सभागृह हे तिप्पट मोठे आहे. तर राज्यसभेचा आकार हा चौपट आहे. लोकसभेत ८७६ आसने आहेत तर राज्यसभेत ४०० आसने आहेत. मुख्य सभागृहाबरोबरच दोन्ही सभागृहांना कार्यालये आणि प्रतीक्षालये असतील. सध्याच्या वास्तूत अशी प्रतीक्षागृहे नाहीत. त्यामुळे सेंट्रल हॉल हा प्रतीक्षागृह म्हणून वापरण्यात येतो. नव्या वास्तूत असा सेंट्रल हॉल नाही. कारण नव्या वास्तूमध्ये लोकसभेच्या सभागृहातच सगळे सदस्य संयुक्त संसदीय सत्रासाठी एकत्र येऊ शकतात.

अंतर्गत सजावट पूर्ण झाली असून त्यात कार्पेट ही उत्तर प्रदेशातील बादोही येथील आहेत. हाताने विणलेली अशी कार्पेट खास वापरण्यात आली आहेत.  पंतप्रधानांनी २०२०मध्ये या नव्या संसदीय भवनाचे भूमीपूजन केले होते. गेल्या वर्षी या संसदीय भवनावरील चार सिंहांच्या राष्ट्रीय चिन्हाचे अनावरण त्यांनी केले. हे राष्ट्रीय चिन्ह ब्राँझचे बनलेले असून ९५०० किलो इतके त्याचे वजन आहे आणि ६.५ मीटर इतकी त्याची उंची आहे.

या संपूर्ण सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात नव संसद भवन, सचिवालय, कर्तव्यपथाच्या दोन्ही बाजूला असलेल्या इमारती पाडून तिथे हे सचिवालय तसेच सेंट्रल व्हिस्टा ऍव्हेन्यूचे बांधकाम झालेले आहे. सचिवालयाच्या १० इमारती असून नॅशनल आर्काइव्हही होईल. पंतप्रधानांचे निवासस्थान, तिथेच जवळ त्यांचे कार्यालय. नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक या इमारतींचे रूपांतर संग्रहालयात केले जाईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा