शहरवासियांनो मेट्रोनेच प्रवास करा! पंतप्रधान मोदींचे आवाहन

शहरवासियांनो मेट्रोनेच प्रवास करा! पंतप्रधान मोदींचे आवाहन

आपल्या देशात शहरीकरण होत आहे. २०३० पर्यंत आपली शहरातील जनसंख्या ६० कोटी होईल. शहरांची ही वाढती लोकसंख्या अनेक संधी घेऊन आली आहे. त्यासोबत आव्हानेही आहे. शहरांत निश्चित सीमेतच सुविधा निर्माण करता येतात. या परिस्थितीत मास ट्रान्सपोर्टेशनचे निर्माण, त्यासाठी आवश्य़क साधनांची निर्मिती महत्त्वाची आहे. आजच्या या दिवशी माझा एक आग्रह प्रबुद्ध नागरिकांना आहे की, आपण मेट्रो प्रवासाची सवय लावायला हवी. मेट्रोतून जेवढा प्रवास कराल तेवढी शहरांची मदत होईल, अशा शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर मेट्रोच्या आवश्यकतेविषयी भाष्य केले.

ते म्हणाले की, २०१४पर्यंत दिल्ली एनसीआरमध्येच मेट्रोचा विकास झाला होता. एक दोन शहरांत मेट्रो होती. पण आता दोन डझन शहरांत मेट्रो पोहोचली आहे. महाराष्ट्राचा त्यात सहभाग मोठा आहे. पुणे, ठाणे, नागपूर, पिंपरी चिंचवडमध्ये आता मेट्रो आहे. महाराष्ट्रात नेटवर्क वाढते आहे. पुणे आपली सांस्कृतिक, आध्यात्मिक साठी प्रसिद्ध आहे. शिक्षण, संशोधन, आयटी, ऑटोमोबाईल क्षेत्रातही आपली ओळख मजबूत केली आहे. अशात आधुनिक सुविधा गरज आहे. आमचे सरकार पुणे वासियांच्या या गरजा लक्षात घेऊन काम करत आहे. मी आज गरवारेपासून आनंदनगर पर्यंत प्रवास केला. या मेट्रोमुळे पुण्यातील रहदारी सोपी होईल. प्रदूषण होणार नाही. पुण्यातील लोकांचे जीवन सुरक्षित होईल. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा या प्रोजेक्टसंदर्भात दिल्लीत येत असत. त्यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांचे अभिनंदन. कोरोना महामारीच्या काळातही हे काम पूर्ण झाले आहे.

पंतप्रधानांनी सांगितले की, २१व्या शतकातील भारतात आपल्याला आपल्या शहरांना आधुनिक बनवायला हवे. त्यात नव्या सुविधा जोडायला हव्यात. भविष्यातील आवश्यकता लक्षात घेऊन आमचे सरकार काम करत आहे. शहरांत जास्तीत जास्त ग्रीन ट्रान्सपोर्ट असावे, इलेक्ट्रिक दुचाकी, बसेस असाव्या, स्मार्ट मोबिलीटी असावी. एकाच कारचा वापर करावा. प्रत्येक शहरात सर्क्युलर इकॉनॉमीला मजबूत केले जावे. सेवेज ट्रीटमेंट प्लान्ट असावेत. प्रत्येक शहरात गोवर्धन प्लान्ट, बायोगॅस प्लॅन्ट असो. एनर्जी एफिशन्सी असावी. रस्त्यांवर एलईडी बल्बची विद्युतव्यवस्था असावी. अशी व्हिजन घेऊन आपण पुढे जात आहेत.

हे ही वाचा:

झेलेन्स्की हिटलिस्टवर

बीएसएफ जवानाच्या अंदाधुंद गोळीबारात सहा जवान ठार

गेली काही दशके सुस्तपणे कामे झाली, प्रकल्प वेळेत पूर्ण व्हायला हवेत!

पंतप्रधान मोदींनी मेट्रो प्रवासात दिव्यांग तरुणांशी मारल्या गप्पा

 

पंतप्रधानांच्या हस्ते मुळा मुठा नदी प्रकल्पाचाही शुभारंभ झाला. नद्यांचे महत्त्वही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, आपण नदी उत्सव साजरा केला पाहिजे. पूर्ण शहरात नदी उत्सवाचे वातावरण बनवायला हवे तर नदीचे महत्त्व पटेल. पाण्याच्या एका एका थेंबाचे महत्त्व कळेल.

Exit mobile version