PM मोदी पुन्हा अव्वल

PM मोदी पुन्हा अव्वल

अमेरिकन संशोधन संस्था, मॉर्निंग कन्सल्टने जारी केलेल्या ‘ग्लोबल लीडर अप्रूव्हल’ रेटिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च टक्केवारीसह अव्वल स्थान पटकावले आहे.

शनिवारी यूएस फर्मने दिलेल्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान मोदींना ७०% गुणांसह सर्वाधिक मान्यताप्राप्त (approval rating) जागतिक नेते म्हणून स्थान देण्यात आले. पंतप्रधान मोदींनंतर मेक्सिकोचे अध्यक्ष लोपेझ ओब्राडोर ६६ टक्के आणि इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी ५८ टक्के असे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

अमेरिकन रिसर्च फर्मच्या रेटिंगमध्ये पंतप्रधान मोदींनी अव्वल स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ नाही. जानेवारी २०२१ मध्ये ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “सर्वात लोकप्रिय सरकारचे प्रमुख” म्हणून रेट केले. सप्टेंबर २०२१ मध्येही, मोदींना ७०% टक्केवारीसह, १३ जागतिक नेत्यांमध्ये सर्वाधिक मान्यताप्राप्त जागतिक नेते म्हणून स्थान देण्यात आले.

पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याही पुढे आहेत. इतर जागतिक नेत्यांमध्ये, जर्मन चांसलर अँजेला मर्केल यांना (५४%) आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना (४७%) मंजूरी मिळाली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन ४४ टक्के मान्यतेसह सहाव्या स्थानावर आहेत, कॅनडाचे जस्टिन ट्रूडो ४३ टक्क्यांसह सातव्या स्थानावर आहेत तर युनायटेड किंगडमचे बोरिस जॉन्सन ४० टक्क्यांसह पहिल्या १० मध्ये आहेत. रेटिंगमध्ये असे म्हटले आहे की ४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत, सरासरी भारतीयांपैकी ७०% पंतप्रधान मोदींना मान्यता देतात तर केवळ २४% लोक त्यांच्या नेतृत्वाला नापसंत करतात.

हे ही वाचा:

नवाब मालिकांविरुद्ध सव्वा कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा

सचिन वाझे १३ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच

दाऊदचा साथीदार चिंकू पठाण सोबत अनिल देशमुख काय करत होते?

आर्यन खान प्रकरण बनाव, सुनील पाटीलचा सहभाग

यूएस रिसर्च फर्म ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्समधील सरकारी नेत्यांसाठी मान्यता रेटिंगचा मागोवा ठेवते.

Exit mobile version