पंतप्रधान मोदी आज देवभूमीत

पंतप्रधान मोदी आज देवभूमीत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देवभूमी उत्तराखंडमध्ये असणार आहेत. उत्तराखंडमधील आदी शंकराचार्य यांच्या समाधीचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. तर आदि शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे देखील पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्याची चांगलीच चर्चा रंगली असून उत्तराखंडच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या दृष्टीनेही हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

२०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रचंड पुराने राज्यात बरेच नुकसान झाले होते. या वेळी आदि शंकराचार्य यांची समाधीही नष्ट झाली होती. या नष्ट झालेल्या समाधीची पुन्हा उभारणी करण्यात आली आहे. या पुनर्बांधणीचे काम पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रकल्पातील प्रगतीत स्वतः पंतप्रधान जातीने लक्ष घालून सातत्याने आढावा घेत होते. तसेच त्यावर देखरेखही करत होते.

हे ही वाचा:

२०३० पर्यंत चीनकडे हजार अण्वस्त्र

महाराष्ट्रात कधी होणार पेट्रोल डिझेलच्या दरात घट?

केदारनाथचा ‘हा’ प्रश्न मार्गी लागला

दिवाळी हा अमेरिकेतही ‘राष्ट्रीय उत्सव’

यावे आपल्या दौर्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी चार धाम देवस्थान बोर्डाच्या संदर्भात काही महत्वाची घोषणा करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमनोत्री अशा चार धामचे पुजारी त्रिवेंद्र रावत यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात लागू झालेल्या देवस्थानम बोर्ड कायद्याला विरोध करत आहेत. या कायद्यानुसार, चार देवस्थानांशी संबंधित ५१ मंदिरे दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या देवस्थानम मंडळाद्वारे नियंत्रित केली जातात.

उत्तराखंड सरकारच्या या निर्णयाला राज्यातून प्रचंड विरोध होत असून आगामी निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला याचा फटका बसू शकतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या आपल्या दौऱ्याच्या निमित्ताने या विषयात एखादी महत्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version