30 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारणपंतप्रधानांनी विविध शहरांच्या महापौरांना काय सांगितले?

पंतप्रधानांनी विविध शहरांच्या महापौरांना काय सांगितले?

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातची राजधानी गांधीनगर येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय भाजपशासित महापौर परिषदेचे डिजिटली उद्घाटन केले.राष्ट्रीय महापौर परिषदेत सर्वांचे स्वागत करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, शहरांच्या विकासासाठी जनतेचा भाजपवर पूर्ण विश्वास आहे. स्वातंत्र्याच्या अमृत काळात पुढील २५ वर्षांसाठी भारताच्या शहरी विकासाचा रोड मॅप तयार करण्यात या परिषदेची मोठी भूमिका आहे. या परिषदेत देशभरातील भाजपशासित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे महापौर आणि उपमहापौर सहभागी झाले आहेत. भाजपच्या महापौरांच्या या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले.

हे ही वाचा:

पत्राचाळ प्रकरणातून मिळालेल्या पैशात संजय राऊत परदेश दौऱ्यावर गेले

“मास्क न वापरलेल्यांकडून कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार दंड वसूल करण्यात आला?”

बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप

अमरिंदर यांच्यासह त्यांचा पक्षही भाजपात विलिन

सामान्य नागरिकाचे नाते जर सरकार नावाच्या कोणत्याही यंत्रणेतून आले असेल तर ते पंचायतीतून येते, नगर पंचायतीतून येते, नगरपालिकेतून येते, महानगरपालिकेतून येते. त्यामुळे अशा चर्चेचे महत्त्व वाढते. आपल्या देशातील नागरिकांनी शहरांच्या विकासासाठी भाजपवर फार पूर्वीपासून विश्वास ठेवला आहे. ती सतत सांभाळणे, वाढवणे ही आपल्या सर्वांची प्रमुख जबाबदारी आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’. हीच वैचारिक पद्धत भाजपने स्वीकारली आहे. हेच आमचे मॉडेल इतरांपेक्षा वेगळे ठरते असेही ते म्हणाले

डिजिटल पेमेंटसाठी प्रोत्साहन द्या

द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरे आता आर्थिक घडामोडींचे केंद्र बनत आहेत. आपण त्या भागात उद्योग समूह विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. छोट्या विक्रेत्यांना डिजिटल पेमेंट वापरण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. यासाठी महापौरांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करून पंतप्रधान मोदी म्हणाले या शहरांमध्ये आमचे स्टार्टअप होत आहेत. त्या भागातील उद्योग समूहांच्या विकासावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे.

केवळ  सत्तेत बसण्यासाठी आलो नाही

परिषदेच्या उद्घाटनावेळी बोलताना भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, आम्ही राजकारणात आलो आहोत, तर आम्ही केवळ  सत्तेत बसण्यासाठी आलो नाही. आपल्यासाठी शक्ती हे माध्यम आहे, ध्येय सेवा आहे. सुशासनाद्वारे जनतेची सेवा कशी करता येईल यासाठी आम्ही काम करतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा