१२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होणार आहेत. यंदाचा हा युवा महोत्सव २५ वा राष्ट्रीय युवा महोत्सव असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान या महोत्सवाचे उद्घाटन करतील. बुधवार, १२ जानेवारी २०२२ रोजी पुद्दुचेरी येथे हा राष्ट्रीय युवा महोत्सव पार पडणार आहे. योद्धा संन्यासी अशी ओळख असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधून या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
१२ आणि १३ जानेवारी, २०२२ असे दोन दिवस या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोविडचा देशभरामध्ये झालेला उद्रेक लक्षात घेऊन आभासी स्वरूपामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोद्दी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर राष्ट्रीय युवा संमेलन होणार आहे. त्यामध्ये चार संकल्पनांवर समूह चर्चा होणार आहे. युवकांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या अनुषंगाने आजच्या काळातल्या समस्या आणि आव्हाने यांना सामोरे जाण्यासाठी तरूणांना प्रेरणा देणाऱ्या संकल्पनांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. यामध्ये पर्यावरण, हवामान, शाश्वत विकास उद्दिष्टे, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि नवकल्पना, स्वदेशी आणि प्राचीन ज्ञान, राष्ट्राचे चारित्र्य, राष्ट्र उभारणी आणि आपल्या देशाला समृद्ध बनविणे, यांच्यावर चर्चा करण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
स्वच्छ ऊर्जेद्वारे हवामान बदलाशी लढा देण्या संदर्भात युवा नेत्यांचे विचार मंथन
मुख्यमंत्री महोदय अजून किती जणांचे आवाज दाबणार?
आजपासून यांना मिळणार बूस्टर डोस
… म्हणून पंतप्रधान मोदींचा फोटो आता लस प्रमाणपत्रावर दिसणार नाही
या महोत्सवामध्ये सहभागी होत असलेल्यांना पुद्दुचेरीचे ऑरोविले, इमिर्सिव्ह सिटी एक्सपिरीअन्स, देशी क्रीडाप्रकार, लोकनृत्य यांच्याविषयांवरील ध्वनिचित्रमुद्रित फीत दाखवण्यात येणार आहे. तसेच ऑलिम्पिकपटू आणि पॅराऑलिम्पिकपटूंबरोबर मुक्त संवाद साधता येणार आहे. यानंतर संध्याकाळचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी आभासी योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत या संदर्भातील माहिती दिली आहे.