पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारी अर्जाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीमध्ये १३ मे रोजी रोड शो आयोजित करणार आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे रोजीचा रोड शो पार पडल्यानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या दिवशी १४ मे रोजी वाराणसी लोकसभा जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.वाराणसीमध्ये सातव्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे.
देशात लोकसभा निवडणुकीचे मतदान सात टप्प्यात पार पडणार आहे.त्यापैकी दोन टप्प्याचे मतदान पार पडले असून उर्वरित पाच टप्प्याचे मतदान बाकी आहे.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उमेदवारी अर्जाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ७ मेपासून सुरू होणार असून १४ मे रोजी संपणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे रोजीचा रोड शो पार पडल्यानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या दिवशी १४ मे रोजी वाराणसी लोकसभा जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
हे ही वाचा:
पवारांनी मुंडेंची लायकी काढली, स्वत:ची दाखवली…
नकली सेनेच्या उद्धव ठाकरे यांच्यात सावरकरांचे नाव घेण्याची हिंमत आहे?
केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाचा विचार केला जाऊ शकतो…
अवघ्या ७२ धावांत गारद होणे हे चांगले लक्षण नाही!
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे यूपीचे प्रमुख अजय राय हे वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान मोदींच्या विरोधात उभे आहेत.विशेष म्हणजे, अजय राय हे पंतप्रधान मोदींच्या विरोधात तिसऱ्यांदा उभे राहिले आहेत.यापूर्वी अजय राय यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढवली होती परंतु त्यांना दोन्ही वेळेस पराभव पत्करावा लागला होता.
तसेच स्टँड-अप कॉमेडियन श्याम रंगीला यांनी देखील वाराणसीमधून पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.मूळचे राजस्थानचे रहिवासी असलेले शाम रंगीला पंतप्रधान मोदींच्या आवाजाची नक्कल करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.