पश्चिम बंगालमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये २७ मार्च ते ६ एप्रिल या काळात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे कसून तयारी करण्यात येत आहे. आज मोदी ब्रिगेड परेड ग्राऊंडवर एका विशान सभेला संबोधित करणार आहेत.
हे ही वाचा:
विधानसभेतील विजयासाठी भाजपा आणि तृणमुल काँग्रेस पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. आज भाजपाच्या परिवर्तन यात्रेची सांगता होणार असल्याने ही सभा महत्त्वाची आहे. त्यामुळे पक्षाकडून किमान १० लाख लोक या सभेसाठी उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ही सभा अभूतपूर्व होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आजची सभा विशेष लक्ष्यवेधी आहे. आजच्या सभेत बीसीसीआय अध्यक्ष आणि भारताचा पूर्व कप्तान सौरव गांगूली आणि प्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.
तृणमुल काँग्रेसच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपली सत्ता पुन्हा राखण्यासाठी उत्सुक आहेत. याऊलट, बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या १० वर्षांची सत्ता बदलण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत.