आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार?

आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. तसेच अनेक राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता देशावासियांशी संवाद साधणार असल्याचं म्हटलं आहे. मोदी कोणत्या विषयावर देशाशी संवाद साधणार हे मात्र ट्विटमध्ये नमूद करण्यात आलेलं नाही. त्यामुळे मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा:

सिद्धूना उपमुख्यमंत्रीपदही नाही आणि प्रदेशाध्यक्षपदही नाही

पहाटेच्या शपथविधीनंतर घरी घेतलं नसतं तर काय लायकी राहिली असती?

अल्फा, डेल्टानंतर हा नवा व्हेरियंट, ७ दिवसांत वजन कमी

पुण्यात हे असतील अनलॉकचे नियम

६१ दिवसांनंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. अनेक ठिकाणी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच कोरोना बळींची संख्याही नियंत्रणात आली आहे. मात्र, अजूनही अनेक राज्यात कोरोना लसीकरण सुरू झालेलं नाही. लसींचा तुटवडा असल्याने लसीकरण थांबलं आहे. या पार्श्वभूमीवर मोदी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version