मेघालयातील गावकऱ्यांनी बनवली पंतप्रधान मोदींच्या नावाने खास ट्यून!

मेघालयातील गावकऱ्यांनी बनवली पंतप्रधान मोदींच्या नावाने खास ट्यून!

ईशान्य भारतातील राज्य ही कायमच आपल्या अनोख्या सांस्कृतिक ठेव्यासाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जातात. नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यापासून या प्रदेशाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यामुळे या प्रदेशातील राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता खूप जास्त आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

मेघालयातील काँगथाँग हे गाव आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतातील काही महत्वाच्या पर्यटन स्थळांपैकी ते एक आहे. UNWTO च्या पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट गाव या स्पर्धेसाठी या गावाला नामांकन मिळाले आहे. या गावाला व्हिसलिंग व्हिलेज म्हणून देखील ओळखले जाते. या गावाची खासियत म्हणजे या गावातील लोकांची ओळख ही त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका विशेष ट्यूनने केली जाते. ही ट्यून शिट्टीवर वाजवली जाते. जसे नवे मुलं जन्माला आल्यावर त्याचे बारसे केले जाते. तसेच काँगथाँग गावात त्यांच्या नावाची एक विशेष ट्यून तयार केली जाते.

हे ही वाचा:

दो साल, जनतेचे हाल

‘बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासाचे एनसायक्लोपिडीयाच होते’

… म्हणून पंतप्रधान मोदींनी केले मराठमोळ्या तरुणाचे कौतुक

जॅकलिनचा ‘तो’ रोमँटिक फोटो ठरणार का ED साठी पुरावा?

या गावातील लोकांनी पंतप्रधान मोदींच्या नावाने आशीच एक विशेष ट्यून बनवली आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी हा विशेष व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत काँगथाँग गावातील एक वयस्कर महिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बनवलेली विशेष धून शिट्टीवर वाजवताना दिसत आहे.

पंतप्रधान मोदी यांनी देखील या व्हिडिओची दखल घेतली आहे. ट्विटरवरून पंतप्रधान मोदींनी काँगथाँग गावातील रहिवाश्यांचे आभार मानले आहेत. तर मेघालयात नुक्त्याचाच पार पडलेल्या चेरी ब्लॉसम महोत्सवाचीही तारीफ केली आहे.

Exit mobile version