राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उत्तर दिले.कोणत्याही कार्यक्रमात नेहरूजींचे नाव घेतले नाही, तर काही लोकांचे केस उभे राहायचे. रक्त खवळायचे. त्यांच्या पिढीतील व्यक्ती नेहरू आडनाव ठेवण्यास का घाबरतात हे मला समजत नाही. नेहरू आडनाव असायला काय लाज आहे. एवढी महान व्यक्ती तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मान्य नाही आणि तुम्ही आमचा हिशेब मागता असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करत जोरदार हल्ला चढवला.
पंतप्रधान म्हणाले , त्यांच्या पिढीतील लोक नेहरू आडनाव का ठेवत नाहीत, हा किती लाजिरवाणा प्रश्न आहे. ते देशाचे पहिले पंतप्रधान झाले आहेत. त्यांचे नाव आम्ही नक्कीच घेऊ, पण त्यांच्या पिढ्यानपिढ्या नेहरू हे आडनाव का ठेवत नाहीत असा सवाल केला.
जुना देश हा सर्वसामान्यांच्या घामाचा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरांचा देश आहे. हा देश कोणत्याही कुटुंबाची जहागीरदारी नाही. आम्ही मेजर ध्यानचंद यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार दिला. दमानमधील एका बेटाचे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावावर ठेवले. ज्या सैनिकांना परमवीर चक्र मिळाले त्यांची नवे बेटांना दिली. घराणेशाही ही चांगली गोष्ट नाही. त्याऐवजी देशाच्या वीरांचा सन्मान केला पाहिजे. असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा:
बहुप्रतीक्षित डबल डेकर वातानुकूलित ई बस सेवा पुढील आठवड्यात सुरु
पीएफआयला २०४७ पर्यंत भारतात स्थापन करायचे होते इस्लामिक राज्य
उद्धव ठाकरेंसमोर त्यांचेच उपनेते वादाला पेटले
राष्ट्रवादीचे औरंगजेब प्रेम पुन्हा जागृत
आमच्यावर राज्यांशी संघर्ष केल्याचा आरोप केला जातो, पण हे लोक सत्तेत असताना त्यांनी ९० वेळा राज्यांची सरकारे हटवली. यांनीच सत्तेत असताना कलम ३५६ चा वापर करून ९० वेळा राज्यांमध्ये सरकार पाडले. एकट्या इंदिरा गांधी यांनी ५० वेळा या नियमाचा वापर करून राज्यांतील सरकारे पाडली. केरळमध्ये कम्युनिस्ट सरकार असो किंवा तामिळनाडूमध्ये करुणानिधी आणि एमजीआर यांची सरकारे असोत त्यांनी ती हटवण्याचेच काम केले असा जोरदार आरोप पंतप्रधांनी केला.