‘जे लोक निवडणूक जिंकू शकत नाहीत त्यांना राज्यसभेवर पाठवले जाते’

पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर घणाघात

‘जे लोक निवडणूक जिंकू शकत नाहीत त्यांना राज्यसभेवर पाठवले जाते’

लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर, दुसऱ्या टप्प्याचा प्रचार जोरात सुरू आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी (२२ एप्रिल) राजस्थानमधील जालोर येथे पोहोचले.या ठिकाणी सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले, जे लोक निवडणूक जिंकू शकत नाहीत त्यांना राज्यसभेवर पाठवून वाचवले जाते.

पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीवर आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.ते म्हणाले की, “तुम्ही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना राजस्थानमधून राज्यसभेवर उदारपणे पाठवले, ते बरेच दिवस आजारी होते, पण तुम्ही त्यांना राजस्थानमध्ये पुन्हा कधी पाहिले का?.

हे ही वाचा:

शतक झळकावल्यानंतर ट्रॅव्हिस हेडचे ‘नो सेलिब्रेशन’

पाकिस्तानला झटका; आझम खान टी-२० मालिकेतून बाहेर

दहशतवाद्यांसाठी काम करणाऱ्या मुख्याध्यापकाला पूंछमध्ये अटक!

शिवम दुबेची पत्नी अंजुम खान ‘धोनीची फॅन’

काँग्रेसवर हल्लाबोल करताना पंतप्रधांन मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या काळात सरकार रिमोट कंट्रोलने चालवले जात होते.ते पुढे म्हणाले, “आज देशातील तरुणांना काँग्रेसचा चेहरा बघायचा नाही. काँग्रेसच्या आजच्या स्थितीसाठी ते स्वतःच दोषी आहेत. ज्या पक्षाने ६० वर्षे राज्य केले आणि एकेकाळी ४०० जागा जिंकल्या, तो पक्ष आज ३०० जागांवर लढू शकत नाही.आज काँग्रेसला उमेदवार देखील मिळत नाहीयेत.इंडी आघाडीची पतंग उडण्याअगोदरच कापली गेली आहे.इंडी आघाडीवाले आपापसात लढत आहेत.ते पुढे म्हणाले, “आज देशात २५ टक्के जागांवर विरोधी आघाडीचे पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. निवडणुकीपूर्वी हीच परिस्थिती असेल तर निवडणुकीनंतर काय होईल.”

आमचे तिसऱ्यांदा सरकार आल्यांनतर ज्यांना घर नाही त्यांना घर देऊ.पुढील आमच्या सरकारच्या काळात ३ कोटी घरे बांधू, ही मोदींची गँरंटी आहे.पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, देशभक्तीने भरलेल्या राजस्थानला माहित आहे की, काँग्रेस कधीही मजबूत भारत बनवू शकत नाही.आज काँग्रेसची जी स्थिती आहे , त्याला ते स्वतःच जबाबदार आहेत.

Exit mobile version