26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणनिष्पक्ष संस्थांना बदनाम करण्यासाठी भ्रष्टाचाऱ्यांची इको सिस्टीम

निष्पक्ष संस्थांना बदनाम करण्यासाठी भ्रष्टाचाऱ्यांची इको सिस्टीम

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात निष्पक्ष संस्था तपास करत असताना या यंत्रणांना बदनाम करायचे षडयंत्र रचले जात आहे असे मोदी म्हणाले. तर भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई झाल्यावर धर्माचा, जातीचा आणि प्रदेशाचा मुद्दा बनवला जातो असे म्हणत मोदींनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे.

आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून चार राज्यात भाजपाने आपली सत्ता राखली आहे. या जबरदस्त प्रदर्शनानंतर देशभर भाजपा कार्यकर्ते जल्लोष साजरा करत असून दिल्ली येथील पक्षाच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पाचही राज्यातील मतदारांचे आभार मानले असून कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

आजचा दिवस हा उत्सवाचा दिवस असून हा उत्सव भारताच्या लोकशाहीचा आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मी या पाचही राज्यात निवडणूकीत सहभाग घेणाऱ्या मतदार त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो असे ते म्हणाले. तर विशेषकरून महिला आणि युवकांनी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला समर्थन दिल्यामुळे आनंद झाल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. मतदानाच्या प्रक्रियेत नवमतदारांना खूप उत्साहाने भाग घेतला आणि भारतीय जनता पार्टीचा विजय सुनिश्चित केला

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मला वचन दिले होते की यावर्षी होळी १० मार्चला सुरू होईल आणि ते वचन त्यांनी पूर्ण करून दाखवले. दिवस-रात्र न बघता निवडणुकीत मेहनत घेत लोकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांचे मी कौतुक करतो. या सर्व कार्यकर्त्यांचे नेतृत्व करणारे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही मी शुभेच्छा देतो. कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाने आज एनडीएने विजयाचा चौकार मारला आहेत असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आजच्या निकालातून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल निश्चित केला आहे असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

पाकिस्तानच्या ‘या’ कृतीमुळे उत्तर कोरियाला आला राग

निवडणूक निकालाच्या दिवशीही ‘कश्मीर फाइल्स’ ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये

पंतप्रधान मोदींच्या सुशासनाला दिलेला जनतेचा हा आशीर्वाद!

मोबाईल रिपेअर करणाऱ्याने मुख्यमंत्री चन्नी यांना केले पराभूत

आजवर उत्तर प्रदेशने देशाला अनेक प्रधानमंत्री दिले आहेत. पण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारा मुख्यमंत्री पुन्हा एकदा निवडून येण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. ३७ वर्षानंतर उत्तर प्रदेशात एखादे सरकार दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. युपी, गोवा आणि मणिपूर या तीन राज्यांमध्ये सत्तेत असून देखील भारतीय जनता पार्टीच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. गोव्यामध्ये सर्व एक्झिट पोल चुकीचे ठरले असून तिथे तिसऱ्यांदा जनतेने आपल्याला सेवेची संधी दिली आहे. दहा वर्ष सलग सत्तेत असूनही राज्यात भाजपच्या जागा वाढल्या आहेत. तर उत्तराखंडमध्ये देखील सलग दुसऱ्यांदा एखादा पक्ष सत्तेत आला आहे. यापैकी एक पहाडी राज्य, एक समुद्र तटावरचे राज्य, एक गंगा मय्याचे राज्य तर एक पूर्वोत्तरचे राज्य, भाजपाला चारही बाजूंनी आशीर्वाद मिळाला आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

या वेळी पंतप्रधान मोदींनी विरोधकांची ही चांगलीच खरडपट्टी केली आहे यामध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचाही समावेश आहे. आज आपण बघतो की निष्पक्ष संस्था भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई करतात. पण हे भ्रष्टाचारी लोक आणि त्यांची इकोसिस्टीम या संस्थांना बदनाम करण्यासाठी मैदानात येतात. हे देशाचे दुर्दैव आहे की घोटाळ्यांनी घेरलेले लोक एकत्र येत आहेत. आपल्या इकोसिस्टीमच्या मदतीने या संस्थांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या तपास यंत्रणांना रोखण्यासाठी आपल्या इकोसिस्टीमला हाताशी धरून नवीन नवीन पद्धती शोधत आहेत. यांना देशाच्या न्यायपालिकेवर विश्वास नाही. पहिले हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करा, नंतर त्याची चौकशी होऊन देऊ नका, तपास झाला तर त्यावर दबाव तयार करा ही या लोकांची प्रवृत्ती आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा