32 C
Mumbai
Monday, December 16, 2024
घरराजकारणपंतप्रधानांनी अशा उडविल्या अविश्वासाच्या ठिकऱ्या

पंतप्रधानांनी अशा उडविल्या अविश्वासाच्या ठिकऱ्या

विरोधकांवर केली घणाघाती टीका

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत जवळपास अडीच तास भाषण केले या भाषणादरम्यान त्यांनी अनेक मुद्द्यांवर काँग्रेसच्या चिंधड्या उडवल्या आणि त्याचवेळी आगामी निवडणुकात जनतेचा विश्वास आमच्यावरच आहे हेही ठासून सांगितले.

त्यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे अंश-

माझ्यावर देवाची कृपा

देशाच्या जनतेने आमच्या सरकारवर जो विश्वास दाखवला आहे. देव खूप दयाळू आहे आणि तो कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपली इच्छापूर्ती करतो. मी याला देवाचा आशीर्वाद मानतो. विरोधी पक्षाला सुचविले आणि ते प्रस्ताव घेऊन आले. २०१८मध्येही हा इश्वराचा आदेश होता. की विरोधी पक्षाचे सदस्य अविश्वास ठऱाव घेऊन आले होते.

 

विरोधकांकडून जनतेचा विश्वासघात

दोन्ही सभागृहात जलविश्वास बिल, मेडिएशन बिल, डेन्टन कमिशन बिल आदिवासी प्रश्न, डिजिटल डाटा प्रोसेशन, कोस्टल ऍक्वाकल्चर बिल हे समंत झआले. ही अशी विधेयके होते. त्यावर गंभीर चर्चा व्हायला हवी होती. पण राजकारण प्राथमिकता आहे. अनेक विधेयके होती. गरिबांच्या आदिवासींच्या कल्याणासाठी होते पण त्यात त्यांना कोणतीही रुची नाही. देशातील जनतेने त्यांना ज्यासाठी पाठवले त्या जनतेचा विश्वासघात केला गेला आहे.

 

आपले कट्टर भ्रष्ट सहकारी यांच्या अटीशर्तीवर लाचार होऊन अविश्वास प्रस्ताव आणला. पण त्यात कशी चर्चा केली आपण. फिल्डिंग विरोधी पक्षांनी लावली मात्र चौकार षटकार आमच्याकडून लावले गेले. विरोधी पक्ष नेते अविश्वास ठरावावर नोबॉल टाकत आहेत इथे शतकं ठोकली जात आहेत.

 

 

या अविश्वास प्रस्तावात काही गोष्टी अशा आहेत की यापूर्वी कधी बघिलत्या नाहीत कल्पना केलेली नाही. मोठ्या विरोधी पक्षनेत्याचे नावच नाही. १९९९मध्ये वाजपेयी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आला. शरद पवार नेतृत्व करत होते. त्यांनी चर्चा सुरू केली. २००३मध्ये अटलजींचे सरकार होते. सोनिया विरोधी पक्ष नेत्या होत्या त्यांनी लीड घेतली. २०१८मध्ये खर्गेंनी विषय पुढे नेला पण यावेळी अधीरबाबूंचे काय हाल झाले. त्यांच्या पक्षाने त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. अमितभाईंनी सांगितले हे चांगले वाटत नाही. आपली उदारता होती तरीही त्यांना संधी दिली. पण गुड का गोबर कैसे करना उनमे ये माहीर है.

 

 

डाग लावण्याचा काहींचा प्रयत्न

२०१४मध्ये ३० वर्षांनी देशातील जनतेने पूर्णबहुमताचे सरकार बनवले. २०१९मध्येही त्या ट्रॅक रेकॉर्ड बघून स्वप्न पूर्ण करण्याची ताकद ओळखली देशाने म्हणून जनतेने पुन्हा एकदा आम्हाला सेवा करण्याच संधी दिली. मजबुतीने दिली. प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे की, युवकांच्या स्वप्नांना त्यांच्या महत्त्वांकाक्षांनुसार संधी द्यावी. सरकारमध्ये असताना आम्हीही खूप प्रयत्न केले. घोटाळाविरहित सरकार दिले. आम्ही युवकांना प्रोफेशनन्सना आत्मविश्वास दिला. संधी दिली. जगात भारताची प्रतिष्ठा बदलली. पुन्हा एकदा नव्या उंचीवर नेले आहे. काहींचा प्रयत्न आहे की याला डाग लागेल पण जग ओळखते की त्यात भारत कशी जबादारी पार पाडेल हे ओळखले आहे.

हे ही वाचा:

दिवाळखोरीकडे चाललेला पाकिस्तान व्हॉट्सऍपला देणार टक्कर

विषारी मशरूममुळे सासू-सासरे बळी; पण जेवण बनवणारी सून जिवंत

इस्रोचे लक्ष चंद्राच्या कक्षेतील ‘ट्रॅफिक’कडे

भारतातील किशोरवयीन मुलांना शोषणास प्रवृत्त करणाऱ्याला १२ वर्षे तुरुंगवास

अविश्वास त्यांच्या रक्तात

काँग्रेससह विरोधी पक्षांबद्दल लोकांच्या मनात अविश्वास आहे. जे सत्य दुनिया लांबून पाहात आहे ते त्यांना इथे दिसत नाही. अविश्वास आणि अहंकार (घमंड) यांच्या रक्तात आहे. त्यांच्या जनतेच्या विश्वासाला ओळखू शकत नाहीत. शहामृगी दृष्टी आहे त्याला देश काय करणार?

काळे कपडे घातले हे बरे झाले!

काही शुभ होत असेल, चांगले होत असेल तर त्याला नजर लागू नये म्हणून काळा टीका लावतात. मंगल होतेय देशाचा जयजयकार होत आहे. मी विरोधकांना धन्यवाद देतो कारण आपण काळे कपडे घालून या चांगलस्या कामाला सुरक्षित केले आहे.

 

विरोधी पक्षाला ‘सिक्रेट’ वरदान

हे विरोधक असे का करतात, का होते असे. मी सभागृहात सिक्रेट सांगणार आहे. माझा पक्का विश्वास आहे की, विरोधी पक्षाला सिक्रेट वरदान मिळाले आहे. ज्यांचे ते वाईट चिंततात त्यांचे भलेच होते.

 

काही दिवसांपूर्वी मी म्हटले होते की, आमच्या सरकारच्या पुढील टर्ममध्ये भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल. भविष्यावर जर त्यांचा विश्वास असता तर देशाच्या येणाऱ्या पाच वर्षात भारत तिसऱ्या क्रमांकावर येणार असे म्हटल्यावर विरोधी पक्षांनी प्रश्न विचारला असता कसे करणार, रोडमॅप सांगा. ते सूचना करू शकले असते. आम्ही लोकांन सांगू की हे तिसऱ्या सांगत आहेत पण आम्ही पहिल्या क्रमांकावर आणू. पण त्यांची वृत्ती अशी आहे की, ते सांगत आहेत, काही करण्याची गरज नाही. असेच होणार आहे. म्हणून हे झोपून राहिले. काही न करताच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असे म्हणत राहिले. असे होणार असेल तर काँग्रेसकडे नीती नाही, नियत नाही आणि व्हीजन नाही. वैश्विक अर्थव्यवस्थेची समज आहे ना भारताची ताकद माहीत नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा