25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणपंतप्रधान मोदींनी लोकसभेत काँग्रेसला पात्रता दाखविली!

पंतप्रधान मोदींनी लोकसभेत काँग्रेसला पात्रता दाखविली!

तासभर झालेल्या भाषणात मोदींनी काढली विरोधकांची पिसे

Google News Follow

Related

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना काँग्रेस व त्यांच्या इकोसिस्टीमचा पार धुव्वा उडविला. गौतम अदानी यांच्याबाबत आदल्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोपांची राळ उडविली होती, त्यावर पंतप्रधान बोलतील अशी अटकळ बांधून राहुल गांधीही सभागृहात उपस्थित होते पण पंतप्रधानांनी अनुल्लेखाने विरोधकांना मारले. अदानी या शब्दाचाही उल्लेख न करता त्यांनी विरोधकांची चांगलीच चंपी केली. त्यात मध्येच त्यांनी शेरोशायरीचाही उपयोग करत सभागृहात हशा पिकविला, वाहवा मिळविली.

ते म्हणाले की, या सत्रात आपल्या पद्धतीने अनेकांनी आपली मते मांडली, तर्क मांडले आणि आपल्या रुची प्रकृतीनुसार आपले म्हणणे मांडले. या गोष्टी आपण ऐकतो समजण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे लक्षात येते की, कुणाची किती क्षमता आहे, किती योग्यता आहे, कुणाची किती आकलन शक्ती आहे, कुणाचा काय इरादा आहे. मोदी यांनी हे वक्तव्य करत राहुल गांधींना टोला लगावला.

‘ये कह कह कर के हम दिल को बहला रहे है

ते म्हणाले की, मी सगळ्या सदस्यांचे आभार व्यक्त करतो. पण काही जणांच्या भाषणानंतर इकोसिस्टीम समर्थक, आनंदाने उड्या मारत होते. काही लोक खुश होऊन म्हणत होते ये हुई ना बात. या लोकांसाठी म्हटले जाते की, ‘ये कह कह कर के हम दिल को बहला रहे है वो अब चल चुके है, वो अब आ रहे है’, राष्ट्रपतींचे भाषण होत होते तेव्हा काही लोक पळाले. आणि एक मोठ्या नेत्याने महामहीम राष्ट्रपतींचा अपमानही केला होता. जनजातीय समुदायाप्रती इथे द्वेष दिसला. ही चर्चा मी ऐकत होतो तेव्हा राष्ट्रपतींच्या भाषणावर कुणी टीका केली नाही. राष्ट्रपती म्हणाल्या की, जो भारत कधी आपल्या समस्यांच्या निराकरणासाठी दुसऱ्यांवर अवलंबून होता तो आज दुनियेच्या समाधानाचे माध्यम बनतो आहे. राष्ट्रपती म्हणाल्या ज्या सुविधांसाठी देशाच्या एका मोठ्या वर्गाने वाच पाहिली ती त्यांना मिळाली. अनेक घोटाळे, भ्रष्टाचार मुक्त होऊ पाहात होतो तो

मला आनंद आहे की, सगळ्यांनी स्वीकार केले हे भाषण. १४० देशवासियांचे आभार मानतो की, सगळ्यांनी राष्ट्रपतींच्या भाषणातील मुद्द्यांना स्वीकृती मिळाली आहे यापेक्षा अधिक गौरव काय?

पंतप्रधान म्हणाले की, अनेक देशांत भीषण महागाई आहे, बेरोजगारी आहे, अन्नसंकट आहे. शेजारी देशातही अवस्था वाईट आहे अशा स्थितीत कोण हिंदुस्थानी अभिमान व्यक्त करणार नाही की या काळातही देश जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनला. आज विश्वात भारताबद्दल सकारात्मकता आहे. एक आशा आहे. भरोसा आहे. ही देखील आनंदाची गोष्ट आहे. की भारत विश्वाच्या जी-२०च्या अध्यक्षपदाची संधी मिळाली ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. १४० कोटी देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. पण अनेकांना त्यामुळेही दुःख होत आहे.

निराशेत बुडालेले काही लोक प्रगतीला स्वीकारू शकत नाहीत. त्यांना लोकांनी कमावलेले हे यश बघवत नाही. त्यांना भारतीयांच्या परिश्रमातून मिळालेले यश दिसत नाही. मागील ९ वर्षांत भारतात ९० हजार स्टार्टअप सुरू झाले. आपण त्याबाबतीत तिसऱ्या नंबरवर आहोत. भारताच्या प्रत्येक ठिकाणी स्टार्टअप पोहोचले. १०८ युनिकॉर्न बनले, एकाचा अर्थ ६ ते ७ हजार कोटी एवढे त्याचे मूल्य आहे. आज भारत जगात मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये दुसरा मोठा देश आहे. स्पोर्टसमध्ये आपली ओळख नव्हती, पण त्यातही भारताचे खेळाडू आपले सामर्थ्य दाखवत आहेत. एज्युकेशन मध्ये भारत पुढे जात आहे. उच्च शिक्षणात ४ कोटी विद्यार्थी, मुलीही मोठ्या संख्येने प्रवेश घेत आहेत. कॉलेजांची संख्या वाढत आहे. स्पोर्टसमध्ये भारताचा तिरंगा ऑलिम्पिक, राष्ट्रकुलमध्ये शानदार कामगिरी केली आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी भारताच्या प्रगतीची काही उदाहरणे दिली.

हे ही वाचा:

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

नाणार होणार, ठाकरे गटाचे काय जाणार?

आता चिल्लर घ्यायला एटीएममध्ये जा!

गल्ल्यांबद्दल कमीपणा वाटून घेण्याची गरजच नाही.

इथे काही निराश आहेत. काका हाथरसीने म्हटले होते की, आगा पिछा देख कर, क्यू होते गमगीन जैसे जिसकी भावना वैसे दिखा सिन. निराशा अशीच आलेली नाही. त्यामागे कारण आहे जनतेचा हुकुम. अनेकवेळा जनतेने हुकुम दिला आहे. विरोधकांना ही निराशा झोपू देत नाही. १० वर्षांत २०१४च्या आधी २००४ ते २०१४ भारताची अर्थव्यवस्था खस्ता झाली होती. त्यामुळे निराशा होणारच.

मोदींनी एक गोष्ट सांगत काँग्रेसच्या नीतीवर प्रहार केला. ते म्हणाले की, जंगलात दोन तरुण शिकारीसाठी गेले आणि गाडीत बंदुका ठेवून ते खाली उतरले. वाघाची शिकार करायला गेले. वाघ मिळेल अशी अपेक्षा होती, पण जवळच वाघ दिसला आता हाताशी बंदूक नव्हती. बंदुक होती गाडीत. मग त्यांनी बंदुकीचा परवाना वाघाला दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न केला तसेच बेरोजगारीसाठी कायदा केल्याचे दाखविले आणि त्या समस्येपासून स्वतःची सुटका करून घेतली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा