६५ तासांमध्ये मोदींनी उरकल्या २० बैठका!

६५ तासांमध्ये मोदींनी उरकल्या २० बैठका!

पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर रविवारी मायदेशी परतले. दिल्ली विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांनी मोदींचे जोरदार स्वागत केले. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा स्वत: देखील तेथे उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात सलग अनेक बैठका घेतल्या. सरकारी सूत्रांनी रविवारी (२६ सप्टेंबर) दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे जवळपास ६५ तास अमेरिकेत होते आणि यावेळी त्यांनी २० सभांना हजेरी लावली. सूत्रांनी सांगितले की, अमेरिकेला जाताना आणि तेथून परत येताना पंतप्रधानांनी विमान प्रवासादरम्यान अधिकाऱ्यांसोबत चार दीर्घ बैठका घेतल्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी अमेरिकेला जात असताना पंतप्रधानांनी विमानात दोन बैठका घेतल्या आणि तेथे पोहोचल्यानंतर हॉटेलमध्ये तीन बैठका घेतल्या. २३ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांनी वेगवेगळ्या सीईओंसोबत पाच बैठका घेतल्या आणि नंतर अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली, अशी माहिती सूत्रांनी सांगितली.

हे ही वाचा:

योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार! सात नव्या चेहऱ्यांना संधी

आज जागतिक नदी दिवस; पण मुंबईतील नद्या मरणपंथाला!

महाराष्ट्र अंतिम फेरीत मुलांमध्ये दिल्लीशी तर मुलींमध्ये कोल्हापूरशी झुंजणार

मोदींनी आणली प्राचीन संस्कृती पुन्हा भारतात

पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे जपानी समकक्ष योशीहिदे सुगा आणि ऑस्ट्रेलियन समकक्ष स्कॉट मॉरिसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधानांनी तीन अंतर्गत बैठकांचे अध्यक्ष पद सांभाळले. पंतप्रधानांनी दुसऱ्या दिवशी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली आणि नंतर क्वाड शिखर परिषदेत भाग घेतला.

२४ सप्टेंबर रोजी त्यांनी चार अंतर्गत बैठकाही घेतल्या. २५ सप्टेंबर रोजी अमेरिकेहून भारतासाठी प्रस्थान करताना पंतप्रधानांनी विमानात दोन बैठका घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी (२२ सप्टेंबर) अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले होते. पंतप्रधानांचा हा दौरा भारतासाठी महत्त्वाचा होता. हिंदी महासागरात चीनचा वाढता प्रभाव, अफगाणिस्तानमधील घडामोडी, अमेरिकेसोबतचे व्यावसायिक संबंध यासाठी हा दौरा महत्त्वाचा होता.

Exit mobile version