हा भारताच्या संघ भावनेचा विजय

हा भारताच्या संघ भावनेचा विजय

भारताने इतिहास रचत १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. गुरुवार, २१ ऑक्टोबर रोजी भारताने हा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. अवघ्या ९ महिन्यांच्या विक्रमी वेळेत भारताने हा टप्पा ओलांडला असून भारताच्या या कामगिरीसाठी कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. भारताचाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून या ऐतिहासिक क्षणाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

भारताने इतिहास रचला आहे. भारताच्या विज्ञान, उद्योजकता आणि १३० कोटी भारतीयांच्या संघ भावनेच्या विजयाचे आपण साक्षीदार आहोत. असे मोदींनी म्हटले आहे. तर १०० कोटी लसीकरण पार केल्याबद्दल त्यांनी भारताचे अभिनंदन केले आहे. ‘आमच्या डॉक्टर, परिचारिका आणि ज्यांनी ही कामगिरी साध्य करण्यासाठी काम केले त्या सर्वांचे आभार.’ असे ट्विट मोदींनी केले आहे.

हे ही वाचा:

शाहरुख खान आर्यनच्या भेटीला!

लसीकरणाच्या ऐतिहासिक क्षणाला १०० वारसा स्थळांना चढणार तिरंग्याचा साज!

बापरे! डॉक्टरांनी ‘किडनी स्टोन’ ऐवजी ‘किडनी’च काढली

अभिमानास्पद! १०० कोटी लसीकरण पूर्ण

तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील ट्विटरवरून या ऐतिहासिक कामगिरीसाठी देशवासीयांची अभिनंदन केले आहे. अनेक आव्हानांवर मात करून या महायज्ञात योगदान देणाऱ्या अनेक शास्त्रज्ञ, संशोधक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो असे अमित शहा यांनी म्हटले आहेत तर प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी दृढनिश्चय असलेल्या मोदीजींचे अभिनंदन करतो असेही ते म्हणाले.

तर महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यां विषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महान नेतृत्वाशिवाय हे शक्य झाले नसते असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Exit mobile version