पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दिली आठवण
भारतीय स्वातंत्र्यात अनेकांचे योगदान आहे. त्यात महात्मा गांधी यांच्याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र यांच्या योगदानाची, त्यांच्या त्यागाची विशेष आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून केलेल्या भाषणात केली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी विविध विषयांना स्पर्श करत देशवासियांना साद घातली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाच्या जडणघडणीत महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचेही मोठे योगदान आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी जो त्याग केला, आपले आयुष्य समर्पित केले त्याची आपण सदैव आठवण ठेवली पाहिजे. या महापुरुषांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा दिवस आहे. गेल्या ७५ वर्षांत संघर्ष करत, विविध आव्हानांना सामोरा जात भारताची वाटचाल सुरू आहे.
हे ही वाचा:
विनायक मेटे अपघात प्रकरणी ट्रक ड्रायव्हरला अटक
फाळणीच्या वेदनांचा ‘घायाळ’ नाट्यानुभव
तुरुंगात असलेल्या मालिकांच्या अडचणीत वाढ, समीर वानखेडेंनी नोंदवला एफआयआर
हा प्रतीक कुमार कोण? त्याचे संजय राऊतांशी संबंध काय?
भारताने जगाला लोकशाहीची ताकद दाखवून दिली आहे. भारतीयांनी स्वदेशीचा आग्रह धरावा असेही आवाहन पंतप्रधानांनी केले. जब हम अपनी धरती से जुडेंगे, तभी तो उँचा उडेंगे अशा शब्दांत त्यांनी भारतीयांना आवाहन केले, एक विश्वास दिला. भारताची ओळख म्हणजे विविधता आहे, तरीही भारताने त्यातून एकजुटीचे दर्शन घडविले आहे. लोकशाही काय असते, याचे दर्शन भारताने जगाला करून दिले आहे. भारत हाच लोकशाहीचा जनक आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.