पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, ३१ मे रोजी देशातील सुमारे १० कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा ११ वा हप्ता हस्तांतरित केला. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी या योजनेंतर्गत २१ हजार कोटी रुपये जारी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
शिमल्याच्या रिज मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान मोदी संवाद साधला आहे. पंतप्रधान किसान योजनेचे परिणाम काय होत आहेत हे जाणून घेणे आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे हा पंतप्रधान मोदींचा हेतू आहे. पीएम किसान व्यतिरिक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारद्वारे चालवल्या जात असलेल्या इतर कल्याणकारी योजनांबद्दल लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
हे ही वाचा:
‘या’ सिलिंडरच्या दरात मोठी कपात
राहुल गांधी आणि सोनिया गांधींना ईडीचे समन्स
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना ‘लता मंगेशकर पुरस्कार’
राजस्थानमध्ये RSS च्या संयोजकांची हत्या; शहरात १४४ लागू
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६ हजार रुपये देण्यात येतात. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. केंद्र सरकार हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवले जातात. आतापर्यंत प्रत्येकी दोन हजार रुपयांचे दहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आले आहेत.