यूपी प्लस योगी, बहोत है उपयोगी….. पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याची चर्चा

यूपी प्लस योगी, बहोत है उपयोगी….. पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी यूपीमधील शाहजहांपूर येथे गंगा एक्स्प्रेस वेची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी भाषण केले. त्यादरम्यान, सीएम योगींच्या विकासकामांवर खूश होऊन त्यांनी त्यांची स्तुती केली. योगीजींना संबोधून मोदीजींनी, ‘यूपी + योगी बोहत हे उपयोगी’ असा नारा दिला. त्याची आता चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

पायाभरणी च्या कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणात पीएम मोदी म्हणाले, ‘आज संपूर्ण यूपीचे लोक म्हणत आहेत की , ‘यूपी + योगी बोहत हे उपयोगी’’. पीएम मोदींच्या या भाषणानंतर मंचापासून मैदानापर्यंत टाळ्यांचा कडकडाट झाला. एवढेच नाही तर या विधानाच्या घोषणा सुरु झाल्या. त्याशिवाय, आपल्या भाषणात विकासासारख्या मुद्द्यांवरून विरोधकांना टोला लगावला.

पायाभरणी समारंभात उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गंगा एक्स्प्रेस वे शेतकरी आणि तरुणांसह प्रत्येकासाठी “अनंत संधी” घेऊन येईल. हा एक्स्प्रेस वे उत्तर प्रदेशच्या विकासाची दारे उघडेल. यामुळे हजारो तरुणांसाठी असंख्य नोकऱ्या आणि अनेक नवीन संधीही मिळतील.

पीएम पुढे म्हणाले की, पूर्वी येथे रात्रीच्या वेळी आणीबाणीची गरज होती, त्यानंतर हरदोई शाहजहांपूरच्या लोकांना लखनौ, कानपूर दिल्लीला पळून जावे लागले. त्यावेळी दवाखाने आणि रस्ते या सोयी सुद्धा नव्हत्या. पण आता वैद्यकीय महाविद्यालयेही आहेत, रस्तेही आहेत. असे कार्य आम्ही करतो. फक्त दमदार काम न करता ते प्रामाणिकपणे करतो. त्याशिवाय समाजातील मागासलेल्यांना सक्षम बनवणे, त्यांच्यापर्यंत विकासाचे फायदे पोहोचवणे ही आमच्या सरकारची प्राथमिकता आहे. हीच भावना आपल्या शेतकरी संबंधित धोरणातही दिसून येते. बियाण्यांपासून बाजारपेठेपर्यंतचे धोरण आम्ही शेतकर्‍यांच्या सोयीचे बनवले आहे.

हे ही वाचा:

सोनचाफ्याला आला सोन्याचा भाव! एक चाफा मिळतोय या किमतीला…

राष्ट्रवादी काँग्रेसने शासकीय निधी देऊन फोडली शिवसेना

महाराष्ट्रात एकच सहकारी साखर कारखाना का सुस्थितीत आहे?

मुलीचे लग्नाचे वय १४ हवे; खासदार बर्क यांची बकबक

 

पीएम सन्मान निधी अंतर्गत, जे पैसे थेट खात्यात पोहोचले त्याचा थेट फायदा लहान शेतकऱ्यांना झाला आहे. आम्ही त्यांना किसान क्रेडिट कार्ड सुविधेने जोडत आहोत. सिंचनाखालील क्षेत्र वाढवणे आणि तंत्रज्ञान वाढवणे हे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे. गावाजवळ अशी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून नाशवंत भाज्यांची लागवड अधिक होईल आणि त्यांचे पीक लवकर बाजारात येईल. याचा फायदा अन्नप्रक्रिया युनिटला होणार असून गावातच बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

Exit mobile version