भारताने चीनच्या हँगझाऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १०७ पदकांसह मिळविलेल्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी या खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यांनी भारताला प्रेरणा दिल्याचे सांगतानाच महिलांनी या स्पर्धेत मोठा वाटा उचलल्याचेही त्यांनी सांगितले. युवकांनी अमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी आता खेळाडूंनीही पुढे यायला हवे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मोदी म्हणाले की, आपल्या सर्वांचे अभिनंदन. हा योगायोग आहे की, याचठिकाणी याच स्टेडियममध्ये १९५२मध्ये पहिले आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या. आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरीमुळे देशाचा गौरव झाला आहे. मी देशाच्यावतीने खेळाडूंचे प्रशिक्षक, ट्रेनर्स यांचे अभिनंदन करतो. मी या पथकात सहभागी असलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन करतो. आपल्या आईवडिलांना मी वंदन करतो. कारण घरातून सुरुवात होते. कारण आईवडिलांनाकडून अनेकवेळा विरोध होतो पण आपल्य. आईवडिलांनी आपल्यावर मेहनत घेतली.
ट्रेनिंग ते पोडियमपर्यंतचा प्रवास पडद्याआडून काम करणाऱ्यांशिवाय शक्य नाही. आपण इतिहास रचलेला आहे. या आशियाई क्रीडा स्पर्धेतील आकडे भारताच्या यशस्वीतेचे साक्षीदार आहेत. आतापर्यंतची ही शानदार कामगिरी आहे.
मला वैयक्तिक स्वरूपात आनंद आहे की, आपण योग्य दिशेने चाललो आहे. जेव्हा लसनिर्मिती काम करत होतो तेव्हा यशस्वी होऊ की नाही अशी शंका होती, पण देशवासियांना लसीमुळे मदत झाली, विदेशातही ती पाठवता आली.
परदेशातील धरतीवर नेमबाजीत आतापर्यंतची सर्वाधिक पदके, तिरंदाजीत, स्क्वॉशमध्ये, रोइंग, महिला क्रिकेटमध्ये सुवर्ण, पुरुष क्रिकेटमध्ये सुवर्ण, गोल्डमेडलची मालिकाच रचली आपण. महिला गोळाफेक मध्ये ७२ वर्षांनी ४ बाय १०० मीटरमध्ये ६१ वर्षांनी, घोडेस्वारीमध्ये ४१ वर्षांनी पदक मिळाले. चार पाच दशकापर्यंत आपले लोक विचार करत होते की, कधी आपल्याला पदक मिळेल पण एवढ्या दशकांची प्रतीक्षा आपल्या पुरुषार्थामुळे संपली, असे मोदी म्हणाले.
एक खास गोष्ट आहे ती म्हणजे आपण जेवढ्या खेळात भाग घेतला त्यात पदक जिंकले. हे भारतासाठी शुभसंकेत आहे. २० इव्हेन्ट असे होते त्यात पदकेच आपल्याला मिळाली नव्हती. अनेक खेळात खातेही उघडले नव्हते. पण आपण नवा मार्ग खुला केला आहे. एक असा रस्ता आपण निर्माण केला आहे जो युवकांच्या पिढीला प्रेरित करेल, असा विश्वासही मोदींनी दिला.
नारीशक्तीचे दर्शन
मोदींनी स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांचे कौतुक केले. ते म्हणाले की, मला अभिमान आहे की, नारीशक्तीने या खेळात जबरदस्त प्रदर्शन केले. ज्या क्षमतेने आपले प्रदर्शन केले ते दाखवून देते. भारताच्या मुलींचे सामर्थ्य काय आहे हे दाखवून दिले. भारताने आशियाई स्पर्धेत जितकी पदके जिंकली ती महिलांनी जिंकली आहेत. याचा शुभारंभ महिला क्रिकेट संघाने केला. ऍथलेटिक्समध्ये तर मुली प्रथम क्रमांक मिळविण्यासाठीच जणू उतरल्या होत्या. नंबर वन हेच त्यांचे उद्दीष्ट आहे. हाच नव्या भारताची प्रेरणा आहे. हीच क्षमता आहे. नवा भारत अंतिम परिणामापर्यंत आपले प्रयत्न सोडत नाही. नवा भारत सर्वश्रेष्ठ योगदान देण्याचा प्रयत्न करतो.
हे ही वाचा:
इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेला आठवला मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला
शासन पद्धतीविषयक अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल
महायुती सरकारचा समित्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला
बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानीची फसवणूक
मोदी म्हणाले की, आपल्या देशात गुणवत्तेची कमतरता कधीही नव्हती. देशात जिंकण्याची इच्छा होतीच खेळाडूंनी याआधीही चांगली कामगिरी केली आहे. पण अनेक आव्हानांमुळे पदकात आपण मागेच राहात होतो. पण २०१४नंतर भारत आपल्या क्रीडाक्षेत्राच्या बदलासाठी प्रयत्न करतो. आपल्या खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात हा प्रयत्न आहे. खेळाडूंना देश व विदेशातील अधिकाधिक संधी मिळावी. संघनिवडीत भेदभाव होऊ नये, गावातील गुणवत्तेलाही जास्तीत जास्त संधी मिळावी हा प्रयत्न आहे.
खेलो इंडियाचे योगदान
मोदींनी या यशात खेलो इंडिया या योजनेचाही वाटा असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, या पथकातील सव्वाशे खेळाडू असे आहेत की जे खेलो इंडियातून भारताला गवसले आहेत. ४०पेक्षा अधिक मुलांनी पदकेही जिंकली आहेत. यातून हे दिसते की, खेलो इंडिया योग्य दिशेला चालले आहे. आता केवळ चांगली कामगिरी नको तर पदके हवीत, विजेतेपद हवे असे खेळाडूंना वाटू लागले आहे. तरुणवर्ग शब्द वापरतो ‘गोट’ अर्थात ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. देशासाठी आपण सगळेच ‘गोट’ आहात. आपली मेहनत, आपल्या आठवणी प्रेरणादायी आहे. आपल्याकडून लहान मुले प्रभावित होतात. आपल्यासारखे बनू इच्छितात. याचा आपण सदुपयोग केला पाहिजे. याआधी मी खेळाडूंना आग्रह केला होता की, शाळेत त्यांनी मुलांना भेटावे. मी आग्रह करतो की, ड्रग्सविरोधात देश लढतो आहे. त्याबद्दल आपण बोलले पाहिजे. जिंकण्याची इच्छा काहीजणांना चुकीच्या मार्गाने नेते. त्यासाठी आपल्या माध्यमातून आपण युवकांना सतर्क करा.