मंगळावर, २१ जून रोजी म्हणजेच आज आंतरराष्ट्रीय योग्य दिवस साजरा केला जात आहे. याचदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटकाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हैसूर येथील पॅलेस मैदानावर आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात सुमारे १५ हजार लोकांनी पंतप्रधानांसोबत योगा केला आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमाला संबोधित केले आहे.
पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश आणि जगाला शुभेच्छा दिल्या आहेत. योग सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमात उपस्थित लोकांना पंतप्रधान मोदींनी संबोधित केले आहे. ते म्हणाले, योगाचा हा चिरंतन प्रवास असाच चिरंतन भविष्याच्या दिशेने सुरू राहणार आहे. हे संपूर्ण विश्व आपल्या शरीरापासून आणि आत्म्यापासून सुरू होते. विश्वाची सुरुवात आपल्यापासून होते आणि योग आपल्याला आपल्यातील प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देतो तसेच जागरूकतेची भावना निर्माण करतो. योगामुळे आपल्याला शांती मिळते. योगाद्वारे शांती केवळ व्यक्तींनाच मिळते असे नाही तर योगामुळे आपल्या समाजात शांतता येते. योगामुळे आपल्या राष्ट्रांना आणि जगाला शांती मिळते आणि योगामुळे आपल्या विश्वात शांतता येत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
Karnataka | Prime Minister Narendra Modi greets the gathering at Mysuru Palace Ground as the Yoga session here concludes.#InternationalDayofYoga pic.twitter.com/pUrIyVtFHe
— ANI (@ANI) June 21, 2022
२०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षातील एक दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांसमोर ठेवला होता, जो स्वीकारण्यात आला आणि २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यानंतर २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिन या थीमद्वारे संपूर्ण मानवतेपर्यंत योगाचा संदेश पोहोचवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्र आणि सर्व देशांचे मनापासून आभार मानले आहेत.