नरेंद्र मोदींच्या बांग्लादेश दौऱ्याला सुरूवात

नरेंद्र मोदींच्या बांग्लादेश दौऱ्याला सुरूवात

Photo credit ANI

कोविड महामारीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेशच्या दौऱ्यावर निघाले आहेत. हा त्यांचा कोविडनंतरचा पहिलाच परदेश दौरा आहे. त्याबरोबरच बांग्लादेश मुक्तीच्या ५०व्या वर्षाचे औचित्य साधून दोन दिवसांचा दौरा आखण्यात आलेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने मोदींच्या प्रस्थानापुर्वी ट्वीट केले होते. यात “मोदींचे बांग्लादेशसाठी प्रस्थान. बांग्लादेश भेटी दरम्यान आपल्या मैत्रीपूर्ण शेजाऱ्याशी असलेले संबंध दृढ करण्यासाठी विविध कार्यक्रमांत सहभाग घेणार आहेत” असे म्हटले होते.

हे ही वाचा:

संजय राऊतांचे युपीए २ चे इमले

बीपीसीएलच्या खासगीकरणाला सुरवात

ड्रीम्स मॉलची आग पुन्हा भडकली

आज सकाळीच मोदींचे बांग्लादेशात स्वागत करण्यात आले. बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी ढाका विमानतळावर मोदींचे स्वागत केले. यावेळी मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

यावर्षी बांग्लादेश त्यांच्या मुक्तीची ५० वर्षे साजरी करत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर गेले आहेत. या दरम्यान ते त्यांच्या राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाला भेट देणार आहेत त्यानंतर ते बांग्लादेशचे परराष्ट्रमंत्री ए के अब्दुल मोमिन यांच्याशी फोनवरून संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर ते राष्ट्रीय दिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत. मोदींच्या हस्ते ‘बापू बंगबंधू डिजीटल व्हिडिओ एक्जिबिशन’चे उद्घाटन करण्यात येणार आहे.

यावेळी मोदींनी सांगितले की, माझा बांग्लादेश दौरा हा केवळ पंतप्रधान शेख हसिना यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखालील बांग्लादेशच्या आर्थिक विकासाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याची केवळ संधी नसून, भारताचा या उपलब्धिंना पाठिंबा दर्शवण्याची देखील संधी आहे. त्याबरोबरच मी बांग्लादेशच्या कोविड-१९ विरूद्धच्या लढ्याला भारताचा असलेला पाठिंबा दर्शवणार आहे.

Exit mobile version