ऑस्ट्रेलिया, जपान सोबतची दोस्ती तुटायची नाय

ऑस्ट्रेलिया, जपान सोबतची दोस्ती तुटायची नाय

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय बैठकांच्या निमित्ताने मोदींचा हा अमेरिका दौऱा पार पडत आहे. या दौऱ्या दरम्यान शुक्रवार, २४ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन या दोघांचीही भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांसोबत मोदी यांची विस्तृत चर्चा झाली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत या भेटींविषयी माहिती दिली. या द्विपक्षीय चर्चांमुळे भारताचे जपान आणि ऑस्ट्रेलिया सोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध अधिकच दृढ होण्यास मदत होणार आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये वाणिज्य उद्योग ऊर्जा अशा विविध क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशाचे प्रमुख हे एकत्र भेटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना “माझे जवळचे मित्र स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत संवाद साधून कायमच बरे वाटते असे म्हटले आहे.”

हे ही वाचा:

आसाम सरकारने मुक्त केली मंदिरांची जमीन

जेंव्हा कमला हॅरिस पाकिस्तानी दहशतवादावर बोलतात…

काँग्रेसमध्ये रागाला जागा नाही, पण अपमानाला आहे?

संजय राऊतांना फुटल्या रावण प्रेमाच्या उकळ्या

तर जपानचे पंतप्रधान सुगा यांच्या सोबतच्या भेटीनंतर “जपान हा भारताचा सर्वात मौल्यवान साथीदार आहे” असे मोदींनी म्हटले आहे. सुगा यांच्या सोबतही त्यांची विविध विषयांवर चर्चा झाली असून दोन्ही देशातील परस्पर सहकार्याला अधिकाधिक चालना देण्यासंदर्भात चर्चा झाली. भारत आणि जपान मधील मजबूत मैत्री ही संपूर्ण भूतलासाठी उत्तम ठरणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

तर आगामी क्वाड बैठकीत पुन्हा एकदा हे तिन्ही नेते आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे एकत्र भेटणार आहेत.

Exit mobile version