आईची भेट, आशीर्वाद आणि खिचडीचा आस्वाद

आईची भेट, आशीर्वाद आणि खिचडीचा आस्वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या आईची भेट घेतली आहे. गुजरात येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन पंतप्रधान मोदी यांनी हिराबेन मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मातोश्री यांच्यात कायमच एक खास नाते राहिले आहे. संघाचे प्रचारक असल्यापासून नरेंद्र मोदी हे गेली कित्येक वर्ष आपल्या कुटुंबापासून वेगळे राहतात. पण तरीदेखील वर्षातून २-३ वेळा ते आवर्जून आपल्या आईशी भेट घेण्यासाठी जात असतात. पण यावेळची भेट वेगळी होती. कारण गुरुवार, १० मार्च रोजी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यश संपादन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दुसऱ्या दिवशीच आपल्या आईची भेट घेऊन आशीर्वाद घेतले आहेत.

काल म्हणजेच शुक्रवार, ११ मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांनी गांधीनगर येथील त्यांच्या मातोश्रींच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी काल अहमदाबाद येथे पार पडलेल्या गुजरात पंचायत महासंमेलनात सहभागी झाले होते. या आपल्या दौऱ्याच्या निमित्तानेच गुजरातमध्ये गेलेल्या पंतप्रधानांनी वेळात वेळ काढत आपल्या आईची भेट घेतली.

हे ही वाचा:

सपाच्या मतांची संख्या वाढली पण भाजपा सरसच!

‘कळसूत्री सरकारच पंचसूत्री अर्थसंकल्प’

चुकून सुटलेले भारतीय क्षेपणास्त्र थेट घुसले पाकिस्तानमध्ये

देवेंद्र फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात

या भेटीची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये नरेंद्र मोदी हे त्यांच्या आईचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. तर दुसऱ्या एका छायाचित्रात पंतप्रधान मोदी आपलट्या आई सोबत भोजनाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदी आणि त्यांची आई दोघे मिळून खिचडीचा आनंद लुटत आहेत. या भेटीत दोघांमध्ये विविध विषयांवर गप्पा झाल्या.

Exit mobile version