27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणकुटुंब रंगलंय गप्पात! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कुटुंबाची पंतप्रधान मोदींनी केले आस्थेवाईक चौकशी

कुटुंब रंगलंय गप्पात! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कुटुंबाची पंतप्रधान मोदींनी केले आस्थेवाईक चौकशी

शिंदेंच्या चार पिढ्यांचे प्रतिनिधी भेटले पंतप्रधानांना

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत जाऊन सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी भेट घेतली. या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असले तरी केवळ ही कौटुंबिक स्वरूपाची भेट होती आणि त्यात पंतप्रधानांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून शिंदे यांच्या कुटुंबियांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी शिंदे यांचे वडील, पत्नी, मुलगा, सून, नातू उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी भेटीचे काही फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले.

 

 

या भेटीत केवळ एकनाथ शिंदे यांचे कुटुंब स्वतंत्रपणे पंतप्रधानांना भेटल्यामुळे चर्चांना ऊत आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार हे सोबत नव्हते याची चर्चा रंगली. पण ही कौटुंबिक स्वरूपाची भेट असल्याचे नंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यात शिंदे यांच्या घरातील चार पिढ्यांचे प्रतिनिधी पंतप्रधानांना भेटले हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. एकनाथ शिंदे यांचे वडील, स्वतः एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे व नातू अशा चारही पिढ्या पंतप्रधानांच्या भेटीला आल्या हे या भेटीचे विशेष ठरले.

 

यासंदर्भातील ट्विटमध्ये मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या मोदी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला. महाराष्ट्रातील जनतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विकासकामांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली. इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याबाबत सहवेदना व्यक्त करत या संकटात केंद्र सरकार पाठीशी असल्याचे ते म्हणाले.

 

 

तसेच बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबत पंतप्रधानांनी माहिती घेतली. कोकणात उदंड पाऊस पडून पाणी समुद्राला मिळते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळवता येईल, मराठवाडा वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजनांबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली. राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, आवश्यक बदल या मुद्द्यांवरही त्यांनी चर्चा केली. गेले वर्षभर केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ राज्य सरकारला मिळत आहे. ते सहकार्य यापुढेही कायम मिळो, ही मागणी मान्य करत पंतप्रधानांनी आश्वस्तही केले. पंतप्रधानांची आपुलकी, आशीर्वादाचा हात आणि आस्था नवे बळ देणारी असल्याचे शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

हे ही वाचा:

अपघातातून सावरलेला ऋषभ पंत होतोय तंदुरुस्त

मणिपूरमध्ये नग्न महिलांची धिंड काढणाऱ्या पाचव्या आरोपीस अटक !

दिल्लीतील दोन मशिदींना इशारा; अनधिकृत बांधकाम हटवा, नाहीतर कारवाई

‘आदेश नसतानाही यासिन मलिकला न्यायालयात का आणले?’

पंतप्रधानांनी या भेटीतही धारावी प्रकल्पाची केली चर्चा

धारावी पुनर्विकास हा सर्वात मोठा प्रकल्प असून त्यामुळे मुंबईचा चेहरा बदलणार आहे. त्याचबरोबर गरीब नागरिकांना सुखाचे आयुष्य जगता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प विनाअडथळा वेगाने पूर्ण करावा, रखडलेले पुर्नविकास प्रकल्प मार्गी लावावेत, असे पंतप्रधांनांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळे राज्यातील असे प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय वारंवार होणारी अतिवृष्टी, त्यामुळे येणारी संकटे यावर आस्थेवाईकपणे चर्चा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा