पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार ६ जून रोजी नाण्यांची नवीन मालिका सादर केली. या नाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ही नाणी ‘ब्लाइंड फ्रेंडली’ आहेत. म्हणजे या नाण्यांवर ब्रेल लिपीमध्ये देखील मूल्य चिन्हांकित केले आहे, जेणेकरून दृष्टिहीन लोकांनादेखील ते ओळखता येतील. यावेळी पंतप्रधान मोदींनी १ रुपये, २ रुपये, ५ रुपये, १० रुपये आणि २० रुपयांच्या नाण्यांची मालिका सादर केली आहे. या नाण्यांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची आठवण करून देणारी कलाकृती साकारली आहे. ही नाणी केवळ महोत्सवासाठी बनवण्यात आली नसून, ती नाणी चलनातदेखील येणार आहेत.
या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा केवळ स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव नाही. स्वतंत्र भारताचे स्वप्न साजरे करण्याची हीच वेळ आहे. देशाच्या महान स्वातंत्र्यसैनिकांनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते तो भारत घडवूया. आज जेव्हा आपण स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहोत, तेव्हा प्रत्येक देशवासीयाचे कर्तव्य आहे की प्रत्येकाने राष्ट्राच्या विकासात काही विशेष योगदान दिले पाहिजे. आझादी का अमृत महोत्सवाला समर्पित नवीन नाणी लाँच करण्यात आली आहेत. ते लोकांना अमृत कालच्या उद्दिष्टांची सतत आठवण करून देतील आणि देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी त्यांना प्रेरणा देतील.
हे ही वाचा:
सोनिया गांधींनी मागितली ईडीकडे वेळ
आत्मनिर्भर भारतासाठी ७६,३९० कोटींच्या संरक्षणविषयक सामग्रीच्या खरेदी प्रस्तावांना मान्यता
ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन अविश्वास प्रस्तावा विरोधात विजयी
कुपवाडामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन याही यावेळी उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या की, सरकारच्या प्रत्येक महत्वाच्या योजना पोर्टलवर प्रदर्शित केल्या जातील. नागरिकांना सरकारी कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वेळी तेचतेच प्रश्न विचारावे लागणार नाहीत असे त्या म्हणाल्या.