पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज १०० किसान ड्रोनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे शेती क्षेत्राच्या अनुषंगाने हे ऐतिहासिक मानले जात असे ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसायाचा कायापालट करणे शक्य होणार आहे.
देशभरात सध्या शेती क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर वाढताना दिसत आहे देश सध्या स्मार्ट शेतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. ज्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्याकडे आणि उत्पन्न वाढविण्याकडे दिला जातो. त्याच अनुषंगाने आता शेती व्यवसायात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याकडे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार भर देताना दिसत आहे.
हे ही वाचा:
शिवनेरीवर बाळ शिवबासाठी पाळणा जोजवला
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम…..
‘दिशा सालियनचा पोस्टमॉर्टेम अहवाल कुठे आहे? डॉक्टरांना कुणी दम दिला’
आज, शनिवार १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘किसान ड्रोन’ ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या योजनेची सुरुवात करताना पंतप्रधानांनी देशभरातील एकूण शंभर किसान ड्रोन्सना हिरवा झेंडा दाखवला, तर ड्रोन वापरासाठी सरकारचा पूर्ण पाठिंबा असेल असे त्यांनी यावेळी सांगितले. लवकरच ड्रोनच्या क्षेत्रात भारत जागतिक स्तरावर नेतृत्व करताना दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. देशात सध्या शंभरपेक्षा अधिक ड्रोन स्टार्ट अप कार्यरत आहेत. तर येत्या काही दिवसात ही संख्या हजारोंच्या घरात जाईल असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. ड्रोनच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शेती व्यवसायात कीटकनाशक फवारणी, जमिनीच्या नोंदी करणे, भाजीपाला, मासे, फळे शेतातून बाजारपेठेत घेऊन जाणे. यासारख्या गोष्टींसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो. या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्येही ड्रोनला प्राधान्य देण्यासंदर्भात सरकारने भाष्य केले होते.