पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय गुजरात दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात त्यांनी अनेक प्रकल्पांचे उदघाटन केले आहे. त्यादरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील नवसारी येथील वडनगर येथील त्यांच्या माजी शाळेतील शिक्षकाची भेट देखील घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवार,१० जून रोजी गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी ‘गुजरात गौरव अभियान’ मध्ये सहभाग घेतला होता. तसेच नवसारी येथील आदिवासी प्रदेश खुडवेल येथे सुमारे ३ हजार ५० कोटी रुपयांच्या विकास उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली आहे. यामध्ये सात प्रकल्पांचे उद्घाटन, १२ प्रकल्पांचा पायाभरणी समारंभ आणि १४ प्रकल्पांचे भूमिपूजन यांचा समावेश होता. हे प्रकल्प या भागातील पाणीपुरवठा सुधारण्यास मदत करतील, तसेच कनेक्टिव्हिटी वाढवण्यास आणि राहणीमान सुलभ करण्यास मदत करतील, असे सांगितले जात आहे.

तापी, नवसारी आणि सुरत जिल्ह्यांसाठी ९६१ कोटी रुपयांच्या १३ पाणीपुरवठा प्रकल्पांचे भूमिपूजनही पंतप्रधान यांनी केले आहे. तसेच त्यांनी नवसारी जिल्ह्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन देखील केले, त्यासाठी सुमारे ५४२ कोटी रुपयांची निधी उभारली आहे.

हे ही वाचा:

नुपूर शर्मांवर कारवाईच्या मागणीसाठी मुस्लिमांची हिंसक आंदोलने

पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्यासाठी खास पगडी

मलिकांची याचिका उच्च न्यायालयानेही फेटाळली

राज्यसभा निवडणूक मतदानापूर्वी महाविकास आघाडीत बिघाडी?

तसेच पंतप्रधान मोदी मधुबन धरणावर आधारित अस्टोल प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन ककरणार आहेत, जे सुमारे ५८६ कोटी रुपये खर्चून बांधले गेले आहे. तसेच १६३ कोटी रुपये किमतीच्या ‘नल से जल’ प्रकल्पांचेही उद्घाटन करतील. या प्रकल्पांमुळे सुरत, नवसारी, वलसाड आणि तापी जिल्ह्यांना पाणी मिळेल.तापी जिल्ह्यातील रहिवाशांना वीज पुरवण्यासाठी ८५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या वीरपूर व्यारा सबस्टेशनचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. सांडपाणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी वलसाड जिल्ह्यातील वापी शहरात २० कोटी रुपयांच्या १४ एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटनही केले जाणार आहे.

Exit mobile version