उत्तर प्रदेशच्या विकासाची गगनभरारी! कुशीनगर विमानतळाचे लोकार्पण

उत्तर प्रदेशच्या विकासाची गगनभरारी! कुशीनगर विमानतळाचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेश मधील नव्या कुशीनगर विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. बुधवार, २० ऑक्टोबर रोजी हा उद्घाटन सोहळा पार पडला. तर या विमानतळावर श्रीलंकेतून पहिले आंतरराष्ट्रीय विमान पोहोचले. या विमानतळाच्या उद्घाटनाने उत्तर प्रदेशच्या विकासाला अधिक चालना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

कुशीनगर हे स्थान बुद्ध तत्वज्ञानाऔ अतिशय महत्त्वाचे मानले जाते. भगवान गौतम बुद्धांच्या जीवनाशी निगडित हे एक महत्त्वाचे स्थान आहे. या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांना मृत्यूनंतर महापरिनिर्वाण प्राप्त झाले. त्यामुळे बुद्ध पंथ स्विकारणाऱ्यांच्या दृष्टीने या जागेचे महत्त्व अधिक आहे.

हिच गोष्ट अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, “भगवान गौतम बुद्धांशी संबंधित जागा अधिक चांगल्या प्रकारे जोडल्या जाव्यात यासाठी सरकारतर्फे विशेष लक्ष दिले जात आहे. जगभरातील भगवान गौतम बुद्धांच्या अनुयायांना चांगल्या सुविधा पुरविण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळेच कुशीनगर विमानतळ विकसित करण्याकडे उत्तर प्रदेश सरकार आणि भारत सरकार या दोघांनीही विशेष प्राधान्य दिले होते.

“या विमानतळाच्या निर्मितीमुळे आसपासच्या परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. तसेच या प्रदेशात रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत. उत्तर प्रदेश राज्यात कुशीनगर विमानतळाच्या सहीत एकूण ९ विमानतळे निर्माण करून लोकांसाठी उपलब्ध केली जात आहेत. ज्यामध्ये ‘जेवर’ या भारतातील सर्वात मोठ्या विमानतळाचाही समावेश आहे. त्याचे काम जलद गतीने पूर्ण केले जात आहे.” असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

Exit mobile version